कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन होणार

जळगाव ः कृषी पदवीच्या विविध सत्रात प्रवेशित विद्यार्थ्यांची अंतिम सत्र लेखी परीक्षा ऑनलाइन होणार आहे.
Of agricultural degree students The exam will be online
Of agricultural degree students The exam will be online

जळगाव ः कृषी पदवीच्या विविध सत्रात प्रवेशित विद्यार्थ्यांची अंतिम सत्र लेखी परीक्षा ऑनलाइन होणार आहे.  कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन घेण्यात आले. त्यात सराव, प्रात्यक्षिके, कार्यानुभव आदी विषयदेखील व्यवस्थित झाले नाहीत. ऑफलाइन परीक्षेसाठी विद्यार्थी तयार नाहीत. यामुळे ऑनलाइन परीक्षा घेतली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या बाबत ‘अॅग्रोवन’ने २२ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. 

ऑफलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध होता. त्याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कृषी शिक्षण परिषदेकडे या विद्यार्थ्यांनी मेल, पत्र पाठवून आपली अडचण सांगितली. त्याची दखल घेऊन विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली होती. तीन वर्षांचे कृषी पदविकेचे शिक्षण घेऊन थेट तिसऱ्या सत्रात किंवा कृषी पदविकेला प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षानंतरही पाचव्या सत्रात ठेवले आहे. असे विद्यार्थी अद्यापही इतर किंवा नियमित कृषी पदवीला दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सहा महिने मागे आहेत, आदी मुद्दे विद्यार्थ्यांनी उपस्थित केले होते. 

दरम्यान, कृषी विद्यापीठाने अंतिम सत्र परीक्षा ऑनलाइन  घेण्याचे निर्देश कोल्हापूर, कराड, मुक्ताईनगर, काष्टी, हाळगाव, नंदुरबार, धुळे आदी कृषी महाविद्यालयांच्या सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख आदींसाठी शुक्रवारी (ता.११) जारी केले आहेत. 

  प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयात 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सत्र १, सत्र १ व ३ (थेट द्वितीय वर्ष २०२१ प्रवेशित), सत्र ३ (२०२० प्रवेशित), सत्र १, ३ व ५ (थेट द्वितीय वर्ष २०२० प्रवेशित) व शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सत्र २ (रीपीट), ४ (रीपीट), ६ यातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र लेखी परीक्षा ऑनलाइन १०० टक्के एससीक्यू पद्धतीने होईल. त्यानुसार प्रश्नपत्रिका संच तयार करण्याची कार्यवाही करावी. प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालय स्तरावर आयोजित करावी, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पत्रात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com