शेतीशाळेसाठी कृषी विभाग सरसावला

शेतीशाळेसाठी कृषी विभाग सरसावला
शेतीशाळेसाठी कृषी विभाग सरसावला

नागपूर : कृषी विस्ताराला बुस्ट देण्यात पुरक ठरणाऱ्या शेतीशाळा उपक्रमाची अंमलबजावणी येत्या खरिपापासून केली जाणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभाग कामाला लागला अाहे. त्याअंतर्गंत पहिल्या टप्प्यातील प्रवर्तकाचे प्रशिक्षण गुरुवारी (ता. १८) आयोजित करण्यात आले आहे. वनामती सभागृहात हे प्रशिक्षण होणार असून यावेळी २५२ प्रवर्तकांची याला उपस्थिती राहील.

कृषी विस्ताराला चालना मिळावी, शेतकरी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संवाद वाढावा, यासाठी कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी पुढाकार घेऊन शेतीशाळा उपक्रमांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गंत कृषी आयुक्‍तालयस्तरावर नुकतीच बैठक झाली. या बैठकीत विविध टप्प्यांवर कृषी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करुन हा उपक्रम यशस्वी करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार नागपूर विभागातील प्रवर्तकांसाठी हे प्रशिक्षण होईल. यावेळी पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्यानंतर हे प्रवर्तक जिल्हा स्तरावर उपपसंचालक तर तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करतील, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

क्रॉपसॅप लिंक्‍ड शेतीशाळा क्रॉपसॅपचे निरीक्षण घेण्यासाठी एका कृषी सहाय्यकाला पिकाचे दोन प्लॉट निवडावे लागतात. प्रस्तावित शेतीशाळा क्रॉपसॅपलाच लिंक करण्यात येणार आहेत. यापुढे एकाच प्लॉटवर क्रॉपसॅपची निरीक्षणे आणि शेतीशाळा घेतली जाईल. त्यामुळे कृषी सहाय्यकाचे श्रम आणि वेळ वाचेल. लागवड ते काढणीपर्यंत हंगामात पाच ते सहा शेतीशाळा होतील. एका शेतीशाळेसाठी सरासरी दहा हजार रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचे सांगितले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com