शहाद्यात कृषी वीजबिल सवलत योजनेला प्रतिसाद

शहादा, जि. नंदुरबार : ‘‘कृषी पंपाच्या थकित वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याच्या महावितरणच्या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.
Agricultural electricity bill in Shahada Response to discount scheme
Agricultural electricity bill in Shahada Response to discount scheme

शहादा, जि. नंदुरबार : ‘‘कृषी पंपाच्या थकित वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याच्या महावितरणच्या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे. शहादा उपविभाग अंतर्गत ३० हजार ६१२ कृषी पंप ग्राहक आहे. त्यांच्याकडे अंदाजित ५६४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. शासनाच्या सवलत योजनेअंतर्गत ३ कोटी ३० लाख रुपये शेतकऱ्यांनी थकीत वीज बिलापोटी भरले. थकित बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे’’, असे आवाहन अभियंता के. डी. पावरा यांनी केले. 

वीज वितरण कंपनीचे शहादा उपविभागांतर्गत धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा आदी तालुके येतात. कृषी पंप धारकांकडे ५६४ कोटी थकबाकी आहे. त्यात ७० कोटी विलंब आकार आहे.

कृषी धोरण योजनेअंतर्गत ५६४ पैकी ३४८ कोटी रुपयांच्या भरणा करणे आवश्यक आहे. त्यातून तीन कोटी २३ लाख रुपयांचा भरणा शेतकऱ्यांनी केला. त्याच बरोबर शहादा विभागांतर्गत १७ कोटी रुपयांची घरगुती व व्यावसायिकांकडे थकबाकी आहे. १५० कोटी पाणीपुरवठा व ६० कोटी स्ट्रीट लाइटचे वीज बिल थकित आहे. 

वीज बिल वसूल व्हावे, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर बैठका अनेक ठिकाणी मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले. वीज बिल भरणे सुलभ जावे, यासाठी महावितरणने हप्त्याची ही योजना केली. परंतु या योजनेचा फायदा बहुतांश नागरिकांनी व शेतकऱ्यांनी घेतला नाही. शासन निर्णय होईल तो होईल, परंतु थकबाकीदारांनी आपले वीज बिल भरणे आवश्यक आहे. शासनाकडून काही निर्णय झाल्यास भरलेले बिल वजा केले जाईल. परंतु, वीज बिल थकवू नका, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले. 

शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा केल्यास विद्युत रोहित्रासाठी ताटकळत राहावे लागणार नाही. शिवाय पिकांनाही योग्य वेळी पाणीपुरवठा होईल. यासाठी वीज बिल भरून कंपनीला सहकार्य करावे.  - के. डी. पावरा, अभियंता, महावितरण, शहादा, जि. नंदुरबार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com