शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी कृषिप्रदर्शन : काडादी

शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी कृषिप्रदर्शन : काडादी
शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी कृषिप्रदर्शन : काडादी

सोलापूर : "शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोचाव्यात, नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतकरी ते ग्राहक संवाद व्हावा, यासाठी कृषिप्रदर्शनाचा उपक्रम उपयुक्त ठरतो आहे. त्यासाठीच दरवर्षी यात्रा काळात त्याचे आयोजन केले जाते,'' असे सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी बुधवारी (ता.१६) येथे सांगितले.

सिद्धेश्‍वर देवस्थान समितीच्या वतीने आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने आयोजित कृषि प्रदर्शनाचे उदघाटन होम मैदानावर काडादी यांच्या हस्ते झाले. आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, कृषि प्रदर्शन समितीचे अध्यक्ष निलकंटाप्पा कोनापुरे, विश्‍वनाथ लब्बा, काशिनाथ दर्गोपाटील, गुरुराज माळगे, बसवराज आष्टगी, सिद्धेश्‍वर बमणी, तुकाराम काळे, शिवकुमार पाटील, प्रा. राजशेखर येळीकर, सुरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.

काडादी म्हणाले," अगदी कमीवेळेत, कमी कालावधीत यंदा प्रदर्शनाला स्टॉलधारकांनी प्रतिसाद दिला. कृषि विषयक अवजारे, सेंद्रिय उत्पादने, शेतीतील नवनवीन प्रयोग, शासनाच्या विविध योजना, प्रयोगशील शेतकऱ्यांची उत्पादने आदींची माहिती या प्रदर्शनात आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.''

बरबडे यांनीही प्रदर्शनातील स्टॉलधारकांच्या सहभागाबाबत आभार व्यक्त केले. शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अमृत कोनापुरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. येळीकर यांनी आभार मानले.

कृषि अवजारे, सेंद्रिय उत्पादने यंदाच्या कृषी प्रदर्शनात सुमारे ५० स्टॉल आहेत. त्यामध्ये खते-बियाणे यासह कृषि अवजारे, ट्रॅक्‍टर, पाईप्सची विविध उत्पादने, यासह सेंद्रिय गूळ, काकवी, गाईच्या गोमूत्रापासून बनवलेली विविध उत्पादने उपलब्ध आहेत. त्याशिवाय कृषिविषयक विविध शासकीय योजनांची माहिती, शेतकऱ्यांचे प्रयोग आणि महिला बचतगटाची गृहोपयोगी उत्पादनेही आहेत. येत्या २० जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com