शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी प्रदर्शने उपयुक्त : नाईक

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी प्रदर्शने उपयुक्त : नाईक
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी प्रदर्शने उपयुक्त : नाईक

नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी कृषी प्रदर्शने उपयुक्त आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत वाढले पाहिजे, यासाठी हे कृषी प्रदर्शने हे माध्यम प्रभावी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. शहरात सुरू असलेल्या नवव्या जागतिक कृषी महोत्सवाला सोमवार (ता.२७) त्यांनी भेट दिली. या वेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. रासायनिक शेतीमुळे आरोग्याचे नुकसान झाले आहे. सेंद्रिय शेतीतून कमी खर्चात उत्पन्न वाढवता येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत मिळत आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार अनेक योजना शेतकऱ्यांना ताकद देत आहेत, असे नाईक म्हणाले.  या वेळी प्रदर्शनाचे आयोजक आबासाहेब मोरे यांच्या हस्ते नाईक यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर नाईक यांनी कृषी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या देशभरातून आलेल्या विविध संस्थांच्या स्टॉलला भेटी देत माहिती घेतली. त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी येथील महिला बचत गटांच्या स्टॉल, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या स्टॉलला त्यांनी भेट दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com