agriculture news in Marathi Agricultural Facilitation Fund will start today Maharashtra | Agrowon

कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभ

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या योजनेला आज (ता. ९) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रारंभ होत आहे. 

नवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या योजनेला आज (ता. ९) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रारंभ होत आहे. एक लाख कोटी रुपयांच्या या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेद्वारे शेतीच्या हंगामानंतरच्या कामांसाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमप्रसंगी कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर हे देखील उपस्थित राहतील.

कोरोना संकटामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकातर्फे जाहीर झालेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानेही १ लाख कोटी रुपयांच्या या योजनेवर औपचारिक मंजुरीची मोहर उमटविली आहे. कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त असलेल्या शीतसाठवण गृहे, संकलन केंद्र उभारणी, प्रक्रिया उद्योग यासारख्या पायाभूत सुविधांसाठी याद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतीमालाचे नुकसान टाळणे आणि शेतकऱ्यांना किफायतशीर दाम मिळणे हे या योजनेचे प्रमुख उद्देश आहेत. 

सहावा हप्ता मिळणार 
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते योजनेचे उद्‌घाटन होणार असून यादरम्यानच प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत ८.५ कोटी शेतकऱ्यांना १७ हजार कोटी रुपयांचा सहावा हप्ता देखील वितरीत केला जाणार आहे. १ डिसेंबर २०१८ ला सुरू झालेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत ९.९ कोटी शेतकऱ्यांना ७५ हजार कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ही रक्कम योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यांमध्ये जमा केली जाते. ही बॅंक खाती आधारशी जोडलेली आहेत.

बँकांचा पुढाकार 
या योजनेअंतर्गत एक लाख कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या वित्तपुरवठादार संस्थांकडून संकलित केला जाईल. सार्वजनिक क्षेत्रातील ११ बॅंकांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आधीच सामंजस्य करार केला आहे. व्याजदरात ३ टक्क्यांची सवलत आणि २ कोटी पर्यंतच्या कर्जाची पतहमी लाभार्थ्यांना मिळेल. त्यात शेतकरी, सहकारी पतसंस्था, बहुद्देशीय संस्था, बचतगट, कृषी उद्योजक, स्टार्टअप यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनाही खासगी-सरकारी भागिदारीतून वित्तपुरवठ्याचा लाभ घेता येईल.


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...