जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू

जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील काम पूर्ण झालेल्या कृषिमाल निर्यात सुविधा केंद्राची शनिवारी (ता. २३) सुरवात करण्यात आली. आंब्यासोबतच द्राक्ष, डाळिंब, केळी, पिकांसाठीही रायपनिंग चेंबर, प्रिकुलिंग, शीतगृह व निर्यातीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

निर्यात सुविधा केंद्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमप्रसंगी खोतकर बोलत होते. याप्रसंगी कृषी भूषण विजयअण्णा बोराडे, बाजार समितीचे उपसभापती भास्करराव दानवे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे, उपजिल्हाप्रमुख पंडीतराव भूतेकर, कृषिभूषण उद्धवराव खेडेकर, सभापती पांडुरंग डोंगरे आदींची उपस्थिती होती.

खोतकर म्हणाले, ‘‘जवळपास चौदा वर्षांपूर्वी राज्याच्या कृषी पणन मंडळाने अपेडामार्फत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा निर्यात केंद्राची उभारणी केली होती. समितीकडे १ नोव्हेंबर २०१७ ला या निर्यात केंद्राची सुत्रे आली. त्यानंतर निर्यात केंद्रात आवश्‍यक ते बदल करून घेतले. त्यामुळे आता या केंद्रावरून कृषी माल निर्यातीची संधी प्राप्त होणार आहे. केंद्रावर द्राक्षासाठी आवश्‍यक सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत.``

लवकरच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख, युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या केंद्राचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती खोतकर यांनी दिली.  रेशीम उद्योगाचा विस्तार पाहता नागपूरस्थित कार्यालयातील दोन उपसंचालकांपैकी एक उपसांचालक कार्यालय औरंगाबादेत हलविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत, असेही खोतकर यांनी स्पष्ट केले. 

शितगृहाला शासनाने व्यापारी दराने वीज न देता सवलतीच्या दराने देण्याचा आग्रह विजयअण्णा बोराडे यांनी धरला. शेतकऱ्यांनी समूहाने शेती केल्याशिवाय उन्नती होणे शक्‍य नाही. अपयशाने खचून न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी शासनाचा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com