Agriculture news in marathi; Agricultural implements plan | Agrowon

धुळे ः कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मिळणार अवजारे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

देऊर,  जि. धुळे  ः शासनाच्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत २०१९-२० या वर्षासाठी कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. यातून विविध अवजारे दिली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २० जूनपर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करायचे आहेत. 

देऊर,  जि. धुळे  ः शासनाच्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत २०१९-२० या वर्षासाठी कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. यातून विविध अवजारे दिली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २० जूनपर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करायचे आहेत. 

शेतीचा वाढता खर्च, मजुरांची कमी उपलब्धता यामुळे यंत्रांद्वारे शेती करणे आता आवश्‍यकच झाले आहे. अनुदानास पात्र यंत्र- अवजारांमध्ये ट्रॅक्‍टर (२० ते ७० एचपी) पॉवर टिलर, कल्टिव्हेटर, पलटी नांगर, रोटाव्हेटर, सबसॉईलर, पॉवर वीडर, मळणी यंत्र, पॉवर ऑपरेटेड स्प्रेयर, मिनी डाळ मिल व राइस मिल, रिपर व पॅकिंग मशिन आदी यंत्रे, अवजारे मिळतील. शेतकऱ्यांनी मंडळातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज जमा करावेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मंडल कृषी अधिकारी अमृत पवार यांनी केले. 

यात अनुसूचित जाती-जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व महिला लाभार्थ्यांसाठी कमाल अनुदान मर्यादा ५० टक्के आहे. इतर लाभार्थ्यांसाठी कमाल अनुदान मर्यादा ४० टक्के आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्ष्यांकाच्या मर्यादेतच लाभार्थींची निवड करण्यात येईल. जे शेतकरी ट्रॅक्‍टरचलित यंत्र, अवजारांसाठी अर्ज करतील त्यांनी अर्जासोबत त्यांच्याकडे किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावे ट्रॅक्‍टर असल्याबाबतचा पुरावा (आरसी बुक) अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे.

प्रत्येक अवजारासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्‍यक आहे. ज्या शेती अवजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे त्या एकाच यंत्र अथवा अवजारास अनुदान दिले जाईल. अर्जाचा विहित नमुना तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाभार्थी निवड करताना ज्येष्ठता क्रमवारी तालुका हा घटक मानून तालुका स्तरावरच सोडत पद्धतीने निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यानुसार उपलब्ध निधीच्या अनुषंगाने पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती दिल्यानंतर एक महिन्याच्या आत यंत्र अवजार खरेदी करून अनुदानासाठीचा प्रस्ताव सादर करावा लागेल. 

इतर बातम्या
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...