agriculture news in marathi Agricultural implements for women | Agrowon

महिलांसाठी शेतीपयोगी अवजारे

वैभव सूर्यवंशी
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

सुधारीत अवजारांचा वापर केल्याने शेतीच्या कामांमध्ये सुलभता येते. सुधारीत अवजारांमुळे मजूरांच्या श्रम कमी लागतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. या अवजारांमुळे पेरणी, आंतरमशागत, कापणी, प्रतवारी करणे सोपे होते. तसेच मजूर आणि वेळेमध्ये बचत होते.
 

सुधारीत अवजारांचा वापर केल्याने शेतीच्या कामांमध्ये सुलभता येते. सुधारीत अवजारांमुळे मजूरांच्या श्रम कमी लागतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. सुधारीत अवजारांमुळे पेरणी, आंतरमशागत, कापणी, प्रतवारी करणे सोपे होते. तसेच मजूर आणि वेळेमध्ये बचत होते.

हस्त चलित सरी बनविणारे अवजार

 • वरंब्यावर शेतात भाजीपाला पेरण्यासाठी सरी- वरंबा तयार करता येतो.
 • कोरडवाहू आणि बायागती शेतीमध्येही उपयुक्त.
 • वेळ, श्रमामध्ये बचत.

ग्रॅबर वीडर 

 • चालविण्यास सोपे, वजनाने हलके.
 • तण काढण्यासाठी मनुष्यचलित अवजार.
 • हाताळण्यास सुलभ आणि आरामदायक.
 • तण काढण्याच्या वेळेत बचत.

कोनो वीडर

 • भाताच्या ओळीतील तण नियंत्रणासाठी उपयुक्त.
 • तण नियंत्रणासाठी वेळ, श्रमामध्ये बचत.

बियाणे ग्रेडर 

 • सोयाबीन, वाटाणा, हरभरा, बाजरी, ज्वारी यासारख्या धान्याची स्वच्छता आणि प्रतवारीसाठी उपयुक्त.
 • वेळ आणि श्रमामध्ये बचत.
 • योग्य प्रकारे प्रतवारी शक्य.
 • कमी देखभाल खर्च.

सॅक होल्डरसह हँगिंग टाइप ग्रेन क्लीनर 

 • मळणीनंतर धान्यातील काडीकचरा वेगळा करण्यासाठी उपयुक्त.
 • पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत कामगारांची उत्पादनक्षमता चार पटीने वाढते.

बियाणे प्रक्रिया ड्रम 

 • योग्य पद्धतीने विविध प्रकारच्या बियाणांवर रासायनिक प्रक्रिया शक्य.
 • वापरण्यासाठी सुरक्षित.

मिल्किंग स्टूल 

 • गाई, म्हशींचे दूध काढताना श्रमात बचत.
 • स्टुलास चाके असल्याने जागेवरून सरकणे सोपे.
 • स्थानिक कारागिराला तयार करता येते.

वैभव विळा 

 • गहू, ज्वारी तसेच गवताची जमिनीलगत कापणी.
 • दातेरी पात्यामुळे विळ्याला धार लावायची गरज नाही.
 • वजनास हलका आणि अधिक चांगली पकड.
 • श्रम आणि वेळेत बचत शक्य.

भेंडी तोडणी कात्री

 • भेंडीच्या देठावर एक प्रकारची लव असते. भेंडी काढताना तळ हात आणि बोटांना त्यामुळे इजा होते. हे लक्षात घेऊन कात्रीची निर्मिती.
 • कात्रीमुळे भेंडी तोडताना हाताला त्रास होत नाही.
 • -एका मजुराद्वारे दिवसाला ५० ते ६० किलो भेंडीची तोडणी.
 • भेंडी काढण्याचा कमी खर्च.

भुईमूग शेंगा तोडणी चौकट 

 • यामध्ये २x१x१ आकाराची चौकट असून,त्यावर उलट्या व्ही आकाराचे दाते लावले आहेत.
 • शेंगा तोडण्यासाठी लागणारी मजूर शक्ती, वेळेची बचत.
 • चार स्री मजूर एकाच वेळी शेंगा तोडणी चौकटीवर काम करतात.
 • शेंगा तोडणीची क्रिया शेंगासाहित असलेल्या वेलीला तोडणी चौकटीवर ओढता मारा देऊन केली जाते. यामध्ये शेंगा फुटण्याचे प्रमाण अत्यल्प.
 • हाताने शेंगा तोडण्यापेक्षा चारपट शेंगा तोडणी जास्त.
 • साधारणपणे हाताने शेंगा तोडताना एक स्री मजूर ३० ते ३५ किलो शेंगा एका तासात तोडते. तीच स्री मजूर शेंगा तोडणी चौकटीच्या साहाय्याने १२० ते १३० किलो शेंगा एका तासात तोडते.

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र

 • एका तासात एक मजूर सरासरी ५० ते ६० किलो शेंगा सहजपणे आणि जास्त श्रम न करता फोडू शकतो.
 • शेंगा वेळेत फोडून होतात.यामुळे वेळ,श्रम ,पैसा वाचतो.
 • यंत्राने शेंगा फोडल्यास ६ ते ८ टक्के फूट होते. मात्र फुटीचे दाणे खाण्यायोग्य असतात. यंत्रातून निघालेले पूर्ण शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.

मका सोलणी यंत्र:

 • यंत्राची रचना अगदी साधी असल्यामुळे उपलब्ध साधन सामुग्रीतून गावातील कारागीर हे यंत्र तयार करू शकतो.
 • आकाराने लहान व वजनाने हलके,त्यामुळे हातात सहजपणे आणि जास्त श्रम न पडता धरता येते.
 • आठ तासात साधारणपणे दोनशे किलो वाळलेली कणसे सोलून होतात.
 • लहान प्रमाणावर मका सोलण्यासाठी उपयोगी.
 • श्रम आणि वेळेची बचत करणारे यंत्र.

दातेरी हात कोळपे:

 • मजुराला उभ्याने कोळपे दोन्ही हाताने मागे पुढे ढकलून दोन ओळीत निंदणी करण्यासाठी चालविता येते.त्यामुळे कामाचा शीण कमी होतो.
 • मजुराची कार्यक्षमता, उत्साह टिकून काम वेगाने होते.
 • कोळप्याचे पाते १५ सें.मी.लांब असते.त्यामुळे दोन ओळींत १५ सें.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकातसुद्धा या कोळप्याने निंदणी,खुरपणी करता येते.
 • कोळप्यामुळे साधारणपणे ३ सें.मी. खोलीपर्यंत खुरपणी होते.
 • सर्व प्रकारची पिके, हलक्या,मध्यम तसेच भारी जमिनीत कोळपे सारख्या क्षमतेने वापरता येते.
 • हात कोळप्याचे वजन ७ किलो असल्याने सहज उचलून नेता येते.
 • एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची खुरपणी करू शकतो.

सायकल कोळपे:

 • याचा उपयोग १५ सें.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी,खुरपणी करण्यासाठी होतो.
 • ५ ते ७ सें.मी.खोलीपर्यंत जमिनीत खुरपणी करता येते.
 • एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची खुरपणी करू शकतो.

नवीन टोकण यंत्र 

 • मनुष्यचलित यंत्र असून मध्यम आकाराच्या बियाणे पेरणीसाठी वापरले जाते.
 • कमी क्षेत्र आणि डोंगराळ भागात सोयाबीन,ज्वारी,मका,इत्यादी पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त.

चक्रीय टोकण यंत्र 

 • एक मनुष्यचलित यंत्र असून सायकल कोळप्याप्रमाणे पुढे ढकलून चालवले जाते.
 • यंत्राद्वारे मोठ्या व मध्यम आकाराच्या बियाण्यांची पेरणी शक्य. उदा.सोयाबीन,ज्वारी,मका,मूग इत्यादी.

बी टोकण यंत्र

 • कापूस ,तूर,मका इत्यादी पिकांची मजुरांच्या साहाय्याने टोकण करताना वाकून,एका हातात बियाणे व एका हाताने बोटाच्या किंवा काडीच्या साहाय्याने जमिनीत बी टोकले जाते. प्रत्येक वेळेस बी टोकताना वाकावे लागते. पिकाची पेरणी करताना २ ते ३ तास सहज काम करणे अशक्य होते.यामध्ये श्रम जास्त लागतात. प्रत्येक वेळेस वाकावे लागत असल्यामुळे कमरेवर ताण येतो. यामुळे आवश्यक कार्यक्षमता मिळत नाही. परिणामी कामाचा वेग कमी असतो.
 • बियाणे टोकण यंत्र वापरले असता टोकणीसाठी वाकावे लागत नाही. चालता चालता उभे राहून सहजरीत्या टोकण करता येते.यामुळे लागणारे श्रम व थकवा कमी होऊन मजुरांची कार्यक्षमता वाढते.
 • उभे राहून चालता चालता बियाण्याची टोकण शक्य.
 • यंत्र वापरण्यास सोपे व आरामदायक.
 • बियाणे एकसमान खोलीवर टोकता येते.
 • कोरड्या किंवा वाफसा असलेल्या जमिनीत टोकण करता येते.
 • यंत्राबरोबर बियाणे ठेवण्यासाठी दिलेल्या पिशवीत बियाणे ठेवता येते. ही पिशवी कमरेला बांधता येते.
 • टोकण यंत्राचे वजन ०.५ किलो आहे. यंत्राच्या पाईपची लांबी १०० सें.मी व व्यास १ सें.मी आहे.
 • यंत्राच्या वरच्या बाजूस बियाणे टाकण्यासाठी नरसाळे बसवलेले आहे,जेणेकरून बियाणे त्यात टाकणे सोपे होते.
 • टोकण यंत्राला दिलेल्या लिवरच्या साहाय्याने यंत्राच्या खालचे तोंड चालू व बंद करता करता येते,त्यामुळे टाकलेले बियाणे जमिनीत टोकले जाते.

संपर्क- वैभव सूर्यवंशी,९७३०६९६५५४
(विषय विशेषज्ञ,कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद फार्म,जळगाव)


इतर टेक्नोवन
काकडीच्या सालापासून पर्यावरणपूरक...खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी...
शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरशेतीसमोरील समस्यांमध्ये बदलते हवामान, मजुरांची...
अल्पभूधारक शेतकऱ्यांने तयार केले छोटे...कोविड १९ च्या काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योगाचे...
काटेकोर शेतीसाठी पिकातील तापमानाचा...पॉलिहाऊस, शेडनेट यासारख्या संरक्षित शेतीमध्ये...
स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्ररब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, साळ, हरभरा,...
महिलांसाठी शेतीपयोगी अवजारेसुधारीत अवजारांचा वापर केल्याने शेतीच्या...
पिकातील सूर्यप्रकाशाची प्रत मोजणारी...आपल्याकडेही हरितगृह, शेडनेटगृहातील लागवड वेगाने...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
संरक्षित व नियंत्रित शेतीचे तंत्रज्ञानकृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण...
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनीवनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये...
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे...कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र...
वेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी...द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे...
कृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा...वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (...
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणेशेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध...
न रडवणारा गोड कांदा!कांदा हा नेहमीच कोणाला न कोणाला रडवतोच... एकतर...
संपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला...वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने...
निर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, ...जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला...
तापमान, वारे, सापेक्ष आर्द्रता...पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (...
सीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...