Agriculture news in marathi Of agricultural inputs sellers Vaccinate preferably | Agrowon

कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे  प्राधान्याने लसीकरण करा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

कृषी बियाणे रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी-विक्रीसाठी गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बियाणे विक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्वरित कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी मागणी येथील विक्रेत्यांनी केली आहे. 

येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी-विक्रीसाठी गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बियाणे विक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्वरित कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी मागणी येथील विक्रेत्यांनी केली आहे. 
तालुका ॲग्रो डीलर असोसिएशन व तालुका ॲग्रो मार्केटिंग मेम्बर्स असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन देण्यात आले.

पुढील पंधरा दिवसांतच खरिपाचा हंगाम सुरू होत आहे. सध्या शेतकरी खरीप पूर्वमशागतीत व्यस्त असून, अल्पावधीतच खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी होणार आहे. विशेषतः पाऊस पडला की शेतकरी मोठ्या प्रमाणात एकाच वेळेस गर्दी करतात. त्यामुळे विक्रेत्यांचा व त्यांचा संपर्क येणारच असून, यातून कोविड होण्याचीही भीती आहे. विक्रेत्यांना बियाणे व खते थेट दुकानातूनच विक्री करावी लागणार असल्याने त्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून तातडीने प्राधान्याने लस दिली जावी, असे यावेळी भुजबळ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 

शहरासह तालुक्यातही अनेक कृषी विक्रेते असून, ही संख्या शंभराच्यावर आहे. त्यामुळे एक दिवस स्वतंत्रपणे कॅम्प घेऊन हे लसीकरण होऊ शकते, असे विक्रेत्यांनी म्हटले आहे. या वेळी निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, असोसिएशनचे प्रदीप मुंदडा, आनंद मुंदडा, सुधाकर आहेर आदी उपस्थित होते. तसेच येवला व्यापारी महासंघातर्फे अत्यावश्यक सेवेतील ज्येष्ठ व्यापाऱ्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे केली आहे.

गर्दीचा सामना करावा लागत असल्याने भाजीपाला, फळे, किराणा, मेडिकल, शेती औजारे, बी-बियाणे, दूध व इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना लसीकरणात प्राधान्य देण्यात यावे, असे निवेदन कोरोना आढावा बैठकीमध्ये देण्यात आले. यावर भुजबळ यांनी एक दिवस किंवा रोज थोडे थोडे, अशा पद्धतीमध्ये अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांना लसीकरणास प्राधान्य द्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. 
 


इतर बातम्या
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
जुलैतील नुकसानीपोटी अकोल्याला ५४ कोटीअकोलाः जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत शेती व...
खानदेशात ई पीक पाहणीला शेतकऱ्यांचा कमी...जळगाव : खानदेशातील सुमारे तीन हजार पाडे, महसुली...
उजनी परिसरात सोयाबीनवर `यलो मोझॅक’ उजनी, जि. लातूर : खरीप हंगामातील प्रमुख सोयाबीन...
वाशीम जिल्ह्यात करडईची पाच हजार एकरवर...वाशीम :  या रब्बी हंगामात क्लस्टर निवड करून...
सांगली जिल्ह्यातील ई-पीक नोंदणीला केवळ...सांगली ः  राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-...
जळगाव जिल्ह्यात सातबारावरील फेरफार...जळगाव : जिल्ह्यात सातबारा उताऱ्यावरील अनेक नोंदी...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मोदींच्या धोरणांमुळे लोकांचा  आर्थिक...औरंगाबाद : जनधन, आधार व मोबाइल या त्रिसुत्रीच्या...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
इंदापूरच्या पश्‍चिम भागात  लाळ्या...वालचंदनगर, जि. पुणे : केंद्र सरकारकडून लाळ्या...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...