Agriculture news in marathi Of agricultural inputs sellers Vaccinate preferably | Agrowon

कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे  प्राधान्याने लसीकरण करा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

कृषी बियाणे रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी-विक्रीसाठी गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बियाणे विक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्वरित कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी मागणी येथील विक्रेत्यांनी केली आहे. 

येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी-विक्रीसाठी गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बियाणे विक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्वरित कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी मागणी येथील विक्रेत्यांनी केली आहे. 
तालुका ॲग्रो डीलर असोसिएशन व तालुका ॲग्रो मार्केटिंग मेम्बर्स असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन देण्यात आले.

पुढील पंधरा दिवसांतच खरिपाचा हंगाम सुरू होत आहे. सध्या शेतकरी खरीप पूर्वमशागतीत व्यस्त असून, अल्पावधीतच खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी होणार आहे. विशेषतः पाऊस पडला की शेतकरी मोठ्या प्रमाणात एकाच वेळेस गर्दी करतात. त्यामुळे विक्रेत्यांचा व त्यांचा संपर्क येणारच असून, यातून कोविड होण्याचीही भीती आहे. विक्रेत्यांना बियाणे व खते थेट दुकानातूनच विक्री करावी लागणार असल्याने त्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून तातडीने प्राधान्याने लस दिली जावी, असे यावेळी भुजबळ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 

शहरासह तालुक्यातही अनेक कृषी विक्रेते असून, ही संख्या शंभराच्यावर आहे. त्यामुळे एक दिवस स्वतंत्रपणे कॅम्प घेऊन हे लसीकरण होऊ शकते, असे विक्रेत्यांनी म्हटले आहे. या वेळी निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, असोसिएशनचे प्रदीप मुंदडा, आनंद मुंदडा, सुधाकर आहेर आदी उपस्थित होते. तसेच येवला व्यापारी महासंघातर्फे अत्यावश्यक सेवेतील ज्येष्ठ व्यापाऱ्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे केली आहे.

गर्दीचा सामना करावा लागत असल्याने भाजीपाला, फळे, किराणा, मेडिकल, शेती औजारे, बी-बियाणे, दूध व इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना लसीकरणात प्राधान्य देण्यात यावे, असे निवेदन कोरोना आढावा बैठकीमध्ये देण्यात आले. यावर भुजबळ यांनी एक दिवस किंवा रोज थोडे थोडे, अशा पद्धतीमध्ये अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांना लसीकरणास प्राधान्य द्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. 
 


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...