वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष स्थापन

वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांना खरीप हंगामामध्ये बियाणे, खते व किटकनाशकाबाबत येणाऱ्या अडचणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
Agricultural inputs in Washim district Monitoring Room Setup
Agricultural inputs in Washim district Monitoring Room Setup

वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांना खरीप हंगामामध्ये बियाणे, खते व किटकनाशकाबाबत येणाऱ्या अडचणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

या नियंत्रण कक्षांशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजता दरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. तक्रार नोंदवायची असल्यास adozpwashim@gmail.com  या ईमेलवर सुध्दा तक्रार नोंदविता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले.

जिल्हास्तरीय कृषीनिविष्ठा सनियंत्रण कक्षात कृषी उपसंचालक एन. आर. ठोंबरे (संपर्क- ९४२१९३६६९१), कृषी सहायक डी.पी. आरु (क्र. ९४०४२५२६७९), जिल्हा परिषद कृषी विभाग मोहिम अधिकारी सी. पी. भागडे (क्र. ८८०५८१०५१८), ग्राम विकास अधिकारी एस. के. इंगळे (क्र. ९७६३२०२२८५), उपविभागीय स्तरावरील कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष तंत्र अधिकारी पल्लेवाड (क्र. ७७४४८२२००१), श्रीमती धांडे (क्र. ९४२०१२४९५४), वाशीम तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ (क्र. ९४२३१२८६२६), कृषी सहायक तक्रस (क्र. ७५८८७९३६१७), पंचायत समिती कृषी अधिकारी आर. पी. भद्रोड (क्र. ९९७५७०११५५), विस्तार अधिकारी ए. एस. मुळे (क्र. ९७६३७३५३४६), मालेगाव तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुनकर (क्र. ९४०५९६६९६६), कृषी सहायक श्री. मानवतकर (क्र. ९९२२२८४८५४), कृषी अधिकारी एस.एल. अवचार (क्र. ९८२२७६३९०५), विस्तार अधिकारी बी. एन. ठाकरे (क्र. ९६८९६६०५०९), रिसोड तालुका कृषी अधिकारी श्रीमती घोलप (क्र. ९४०५९६६९६६), कृषी अधिकारी श्री. मानवतकर (क्र. ९९२२२८४८५४), कृषी अधिकारी आर. एन. जोशी (क्र. ७८७५५८४२४३), पंचायत समिती विस्तार अधिकारी गावंडे (क्र. ९७६६४९६३०५), मंगरुळपीर तालुका कृषी अधिकारी रविंद्र इंगोले (क्र. ९४०४०९३९८६), कृषी अधिकारी अशोक इंगोले (क्र. ९४२०३५३३०९), पंचायत समिती कृषी अधिकारी पी. एस. शेळके (क्र. ९२८४५६६३०९), विस्तार अधिकारी आर. बी. वाडणकर (क्र. ७५८८०९०४५०), मानोरा तालुका कृषी अधिकारी के. डी.  सोनटक्के (क्र. ९४०४३३८२१६), कृषी पर्यवेक्षक एस. एन. मनवर (क्र. ९३२९११८९३८), पंचायत समिती कृषी अधिकारी डी. एस. मकासरे (क्र. ९९२१४७३९५५), कारंजा तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके (क्र. ९४२२९२१०९०), कृषी अधिकारी प्रमानंद राऊत (क्र. ९४८४९२४०८०), पंचायत समिती कृषी अधिकारी पी. एस. देशमुख (क्र. ७५८८७६३४२७), विस्तार अधिकारी एस. व्ही. कोल्हे (क्र. ९८८१९४८२२५) यांचा या सनियंत्रण कक्षात समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com