agriculture news in marathi Agricultural laborers will get a cover of two lakh rupees for accident insurance | Page 2 ||| Agrowon

शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे कवच मिळणार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-श्रमपत्र मिळवून देणारी योजना शेतीत कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यांना देखील लागू आहे. त्यामुळे नोंदणीकृत मजुरांना दोन लाखांपर्यंत अपघाती विम्याचे कवच मिळणार आहे.

पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-श्रमपत्र मिळवून देणारी योजना शेतीत कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यांना देखील लागू आहे. त्यामुळे नोंदणीकृत मजुरांना दोन लाखांपर्यंत अपघाती विम्याचे कवच मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

देशात ३८ कोटी असंघटित कामगार व मजूर आहेत. त्यांची माहिती संकलित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-श्रम’ नावाचे एक संकेतस्थळ (पोर्टल) सुरू केले आहे. तेथे मोफत नोंदणी करता येते. आतापर्यंत या संकेतस्थळावर देशभरातील आठ कोटींहून अधिक असंघटित कामगार, मजुरांनी नोंदणी केली आहे. 

कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की या योजनेचे कोणतेही काम कृषी विभागाच्या कक्षेत येत नाही. त्यावर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे नियंत्रण आहे. मात्र नोंदणीची सुविधा ऑनलाइन व मोफत आहे. त्यामुळे गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रावर जाऊन मजुरांनी नोंदणी करून घ्यावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या मजुरांना मार्गदर्शन व मदत करावी. कारण, बहुतेक मजुरांना ही योजना माहीत नाही. 

नोंदणीकृत मजुराला कोणत्याही अपघातामुळे छोट्या स्वरूपाचे अपंगत्व आल्यास त्याला एक लाखाची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. अपंगत्व कायमस्वरूपी असल्यास किंवा मृत्यू झाल्यास मदतीची रक्कम दोन लाखांपर्यंत असू शकते. संकेतस्थळावर नोंदणी करताना हाताशी आधार क्रमांक, आधार संलग्न मोबाइल क्रमांक, बॅंक खात्याचा तपशील ठेवावा लागतो. तसेच मजुराचे वय १६ ते ५९ वर्षे या दरम्यान हवे आहे. 
नोंदणी केल्यानंतर असंघटित कामगारांना ‘डिजिटल ई-श्रम कार्ड’ उपलब्ध होते. या कार्डवरील सर्वसमावेशक खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) देशभरात कुठेही विविध कामांकरिता स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे अशा मजुरांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पुन्हा इतर ठिकाणी नोंदणी करण्याची गरज नसेल. 

कोण ठरू शकतात लाभार्थी 
शेती व शेतीसंलग्न क्षेत्रातील मजूर, रोजगार हमी योजनेवरील मजूर, बांधकाम क्षेत्र, मासेमारी, रोजंदारी करणारे मजूर, फलाटावर काम करणारे मजूर, फेरीवाले, घरगुती काम करणारे.

कुठे करावी लागते नोंदणी ः https://register.eshram.gov.in या संकेतस्थळावर

नोंदणी केल्यास कोणते लाभ मिळतात ः
अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये मिळतात. अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास नोंदणीकृत मजुराला दोन लाख रुपये, तर आंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते.
 


इतर बातम्या
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...