Agriculture news in marathi; Agricultural leakage breaks down in Satana taluka; Sarpanche confesses | Agrowon

सटाणा तालुक्यात शेतीशेजारील पाझर तलाव फोडला; सरपंचाने दिली कबुली

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

नाशिक  : सटाणा तालुक्यातील चौगाव, अजमीर सौंदाणे व कऱ्हे शिवारात शासनाने लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या लखमी पाझर तलावात चौगावच्या सरपंच लक्ष्मण मांडवडे यांनी अतिक्रमण केले. एवढंच नाही तर द्राक्ष व डाळिंबाची बाग पाण्याखाली जाऊ नये, यासाठी शेजारील शेतकऱ्यांचा विचार न करता पाझर तलावाचा बंधारा फोडला. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.

नाशिक  : सटाणा तालुक्यातील चौगाव, अजमीर सौंदाणे व कऱ्हे शिवारात शासनाने लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या लखमी पाझर तलावात चौगावच्या सरपंच लक्ष्मण मांडवडे यांनी अतिक्रमण केले. एवढंच नाही तर द्राक्ष व डाळिंबाची बाग पाण्याखाली जाऊ नये, यासाठी शेजारील शेतकऱ्यांचा विचार न करता पाझर तलावाचा बंधारा फोडला. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.

सरपंचांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि १५ नोव्हेंबरच्या आत तलावाच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा बागलाण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, सदर सरपंचाने तलाव फोडल्याची कबुली दिली असून तहसीलदारांकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन दिवसात तलावाचे बांधकाम करून देण्याची ग्वाही दिली आहे.

शेतकऱ्यांनी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सोळा वर्षांपूर्वी शासनाने अजमीर सौंदाणे, कऱ्हे व चौगाव शिवारात पंधरा ते वीस लाख रुपये खर्चून लखमी पाझर तलाव बांधला होता. मात्र, या पाझर तलावात चौगावचे सरपंच लक्ष्मण मांडवडे यांनी पदाचा गैरवापर करून ऐंशी टक्के क्षेत्रात अतिक्रमण केले. बंधाऱ्यालगत शेततळे तयार करून त्याचाही लाभ घेतला आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला आणि धरणात पाणी आले. मात्र, सरपंच मांडवडे यांनी धरणात आलेले पाणी आपल्या शेतात जाऊ नये, यासाठी अजमीर सौंदाणेकडे राहणाऱ्या शेतककऱ्यांचा विचार न करता बांध फोडून टाकला. सदर बांध फोडल्यामुळे लखमी नाल्यालगतच्या शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले. तसेच पिकांचेही मोठे नुकसान झाले. 

लक्ष्मण मांडवडे यांनी पत्नी ललिता यांच्या नावे तहसीलदारांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, मी केलेला गुन्हा हा फौजदारी स्वरूपाचा आहे, याची मला जाणीव आहे. माझ्या नावाने शेतीच्या क्षेत्रात पाझर तलाव असून लखमी पाझर तलावाचा भराव माझ्याकडून नजरचुकीने फोडला गेला आहे. पाझर तलावाचे बांधकाम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मी स्वखर्चाने पूर्ण करून देईन. ते पूर्ण न केल्यास होणाऱ्या शिक्षेस तयार असेन, असे लिहून दिले  आहे.


इतर बातम्या
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...