कृषी यांत्रिकीकरण म्हणजे शेतमजुरांचे उच्चाटन नव्हे

कृषी यांत्रिकीकरण म्हणजे शेतमजुरांचे उच्चाटन नव्हे
कृषी यांत्रिकीकरण म्हणजे शेतमजुरांचे उच्चाटन नव्हे

नागपूर  ः कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरण म्हणजे शेतमजुरांचे किंवा श्रमिकांचे उच्चाटन नसून त्यांचे कष्ट कमी करण्याचा उपाय आहे. कमी कष्टात, कमी वेळेत, जुजबी खर्चात व स्थानिक उपलब्ध संसाधनाचा उपयोग करून शेतीच्या कामाची उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. तसा विचार व कृती सर्वांनीच करणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन विश्‍वेश्‍वरईय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी केले. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निवडक कृषी अवजारेनिर्मिती व शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधी कार्यशाळेत ते उद्‌घाटक म्हणून बोलत होते. विश्‍वेश्‍वरईय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत सुरू असलेल्या कृषी संशोधनाची त्यांनी या वेळी माहिती दिली. त्यांची संस्था कृषी अवजारे निर्माते व शेतकरी उत्पादक कंपनीच्या उत्कर्षासाठी सदैव तत्पर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे, केंद्रीय संस्था संशोधन संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेचे संचालक डॉ. गुप्ता, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. बस्तेवाड, केंद्रीय कृषी संयंत्रे प्रशिक्षण व परीक्षण बुदनी (मध्यप्रदेश) या संस्थेचे डॉ. तिजारे,  डॉ. आशुतोष पंदीरवार, अकोला कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश ठाकरे, परभणी कृषी विद्यापीठाच्या डॉ. स्मिता खोडके, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा संस्थेच्या पूजा माऊलीकर, प्रभाकर अत्रे यांची या वेळी उपस्थिती होती. वनामतीचे संचालक डॉ. रवींद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रास्ताविकातून त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश सांगितला. शेतकरी, उत्पादक कंपनी, कृषी अवजारे निर्मिते व कृषी शास्त्रज्ञ यांच्यामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. वनामतीमध्ये प्रशिक्षण घेऊन स्वतःची ट्रायकोडर्मा प्रयोगशाळा आपल्या गावात सुरू करणारे शेतकरी भीमटे यांचा डॉ. पडोळे यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com