agriculture news in marathi, Agricultural Prabodhan through Ganeshotsav in Gondia District | Agrowon

गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती प्रबोधन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान विस्ताराचा आगळावेगळा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाअंतर्गत लेंडीजोग (ता. देवरी) येथे जाणीव जागृती करण्यात आली.

गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान विस्ताराचा आगळावेगळा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाअंतर्गत लेंडीजोग (ता. देवरी) येथे जाणीव जागृती करण्यात आली.

गणेशोत्सव हे लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे हेरून बऱ्हाटे यांनी दोनवेळच्या आरतीला जमणाऱ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान विस्ताराची कल्पना मांडली. ती प्रत्यक्षातदेखील आणली आहे. लेंडीजोग (ता. देवरी) येथे झालेल्या या कार्यक्रमाला पोलिस पाटील आनंद मानकर, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा वट्टी, शालीकराम मानकर उपस्थित होते.

कृषी सहायक डी. एस. हरदुले यांनी जागृती सभा घेतली. धानावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. डीबीटीच्या माध्यामतून थेट खात्यात ही रक्‍कम जमा केली जाणार असून, त्याकरिता शेतकऱ्यांनी बिले सांभाळून ठेवावी. तुडतुड्याचे निरीक्षण घेण्यासाठी लावण्यात आलेल्या वीज तसेच फेरोमोन ट्रॅपमध्ये खोडकिड्याचा पतंग, तुडतुडे आढळून आले, असे हरदुले यांनी सांगितले.  

प्रबोधनाचा खास पर्याय
गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारा प्रबोधनाचा हा उपक्रम जिल्ह्यात फारच यशस्वी ठरला आहे. धार्मिक उत्सवात लोक एकत्रित येतात. या गर्दीचा उपयोग प्रबोधनासाठी केला जात असून, ग्रामस्थांचादेखील त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...