गावागावांतील चेकपोस्टमुळे शेतातच अडकला शेतमाल 

लॉकडाऊन सुरू झाल्यावर सुरूवातीला शेतमाल विक्रीसाठी अडचणी येत नव्हत्या. मात्र, पुणे शहरातील काही पेठा कोरोनामुळे रेडझानमध्ये गेल्यामुळे जसजसा लॉकडाऊन वाढत गेला तसतसा पोलिसांकडून अडवणूक सुरू झाली. आता ग्रामीण भागातही कोरोना पोहचला आहे. आता गावेही सतर्क झाल्यामुळेअनेक ठिकाणी चेकपोस्ट सुरू झाले असून शेतमाल वाहतुकीच्या गाड्याची अडवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही दिवसाआड शेतमालाच्या गाड्या पाठवित आहोत. - संदीप सुक्रे, स चिव, केंद्राईमाता फार्मर प्रोड्युसर कंपनी, केंद्रूर, ता. शिरूर
MOSAMBI
MOSAMBI

पुणे ः कोरोनामुळे गावागावांत सुरू करण्यात आलेल्या चेकपोस्टच्या ठिकाणी पोलिसांकडून शेतमालाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करून अडवणूक करण्यात येत आहे. यामुळे गावातून दुसऱ्या गावात जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. याचा फटका शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीलाही बसत आहे. त्यामुळे शेतमाल शेतातच अडकत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.  सद्यपरिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना संक्रमण गावात होऊ नये, म्हणून ग्रामपंचायती व प्रशासनाने पुढाकार घेऊन चेकपोस्ट बसवत आहे. या चेकपोस्टमुळे गावागावांमधून शहरामध्ये जाणारा भाजीपाला, फळे, दूध नेण्यास प्रशासनाकडून रितसर परवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बराच वेळ जात असून परवानगी वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच भाजीपाला दुध घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना शहरातून आल्यावर क्वारंटाईन केले जात आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी  अडचणी येत आहे.  सध्या प्रशासनाने शेतमाल, दूध घेऊन जाणाऱ्या गाड्यांना वाहतुकीची परवानगी देण्याची प्रक्रिया सुलक्ष व जलद केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. साधारणपणे प्रत्येक गावातून पाच ते दहा क्विंटल शहरांकडे जाणारा शेतमाल सध्या गावातच अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाने चेकपोस्टवरून शेतमाल वाहतुकीसाठी लागणारी परवानगी कोणत्याही कागदपत्रामध्ये न अडकविता द्यावी.  दुसरीकडे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असले तरी भाजीपाला, फळे, दूध घेण्यासाठी बाहेर पडत आहे. त्यातच अनेक ठिकाणी भाजीपाल्याची टंचाई भासत असून भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक यांच्यामध्ये मोठी दरी तयार होत आहे. त्यामुळे चेकपोस्टच्या ठिकाणी वाहतुकीची होणारी अडवणूक ही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. यावर उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने शेतमाल गाड्याची अडवणूक न करण्याच्या सुचना द्याव्यात अशी मागणी गावांगावातील शेतकरी करू लागले आहेत.  याविषयी वेल्हे तालुक्यातील मार्गास्नी येथील शेतकरी नथु एकनाथ वालगुडे म्हणाले की,`` शेतामध्ये भाजीपाला, फळे विक्रीसाठी तयार झाली आहेत. ती शहरात घेऊन जाण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन परवानगी घ्यावी लागत आहे. तसेच गावांगावात ठिकठिकाणी उभारलेल्या चेकपोस्टमुळे  बराचसा कालावधी जात आहे. तरी प्रशासनाने शेतमाल वाहतुकीसाठी लागणारी परवानगी ग्रामस्तरावरून देण्यात यावी.  प्रतिक्रिया  आम्हाला रोज शिरूर येथे शेतमालाची विक्री करावी लागते. नगर आणि पुणे जिल्हयाच्या सिमेवर पोलिसांचा चेकपोस्ट असल्यामुळे पोलिसांकडून रोज अडवणूक केली जात आहे. त्यामुळे शेतमाल विक्री करताना खूप अडचणी येतात.  - दिपक खंदारे, शेतकरी, वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com