Agricultural pump arrears Short response to recovery
Agricultural pump arrears Short response to recovery

कृषिपंप थकबाकीच्या वसुलीला अल्प प्रतिसाद

आमलाड, जि. नंदुरबार ः कृषिपंप थकीत वीजबिल वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी संजीवनी योजनेला तालुक्यातील शेतकरी अल्प प्रतिसाद देत आहेत.

आमलाड, जि. नंदुरबार ः कृषिपंप थकीत वीजबिल वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी संजीवनी योजनेला तालुक्यातील शेतकरी अल्प प्रतिसाद देत आहेत. वास्तविक या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थकीत वीजबिलात सूट दिली आहे. रब्बी हंगामातील शेतमाल विक्रीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला आहे. त्यामुळे शेतकरी या योजनेस चांगला प्रतिसाद देतील, अशी आशा महावितरण कंपनीला आहे. 

तळोदा तालुक्यात सहा हजार ६२८ कृषिपंपधारक ग्राहक आहेत. त्यांच्याकडे मागील थकबाकीसह एकूण १०५ कोटी थकबाकी आहे. यात कृषी संजीवनी योजनेंतर्गत सूट मिळून एकूण ७४ कोटी ९० लाखांवर थकबाकी भरणे अपेक्षित आहे. थकबाकीनुसार सूट देऊन उर्वरित रकमेची आकारणी केली जात आहे. ही रक्कम एकरकमी भरणे आवश्यक आहे.

काही शेतकऱ्यांची ही रक्कम ५० हजारांपासून एक लाखांवर जात आहे. त्यामुळे ही रक्कम एकदम भरणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या तळोदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप चहांदे, शहर अभियंता इम्रान पिंजारी, बोरद येथील कनिष्ठ अभियंता विलास गुरव, सहायक अभियंता नीरजकुमार कर्मचाऱ्यांसह वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत सुमारे अडीच कोटींवर वसुली झाल्याचे उपकार्यकारी अभियंता चहांदे यांनी सांगितले. 

शंभर कोटींची थकबाकी 

तालुक्यात ९९७७ घरगुती ग्राहकांकडे दोन कोटी १४ लाख १३८ औद्योगिक ग्राहकांकडे २३ लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक दोन कोटी ५५ लाख, स्ट्रीट लाइट एक कोटी ९८ लाख, व इतर नऊ कोटी ८४ लाख अशी एकूण सुमारे शंभर कोटी थकबाकी आहे. वरील थकबाकी वसुलीस चांगला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com