Agriculture news in Marathi Agricultural pump electricity bill unreal | Page 4 ||| Agrowon

कृषी विजबिले अवास्तव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग वाढली तर दुसरीकडे महावितरणने थकीत वीजबिल वसुलीचा धडाका लावल्याने वातावरण ढवळून निघत आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज कापण्यात आल्याने रब्बीच्या तोंडावर संकट उभे ठाकले आहे.

अकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग वाढली तर दुसरीकडे महावितरणने थकीत वीजबिल वसुलीचा धडाका लावल्याने वातावरण ढवळून निघत आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज कापण्यात आल्याने रब्बीच्या तोंडावर संकट उभे ठाकले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वीज कंपनी, शासनाच्या धोरणांना जबाबदार ठरवले आहे. होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.

वीज प्रश्नाबाबत जानेफळ येथील शेतकरी रमेश निकस म्हणाले, दिवसभरात शेतकऱ्याला आठ तास वीज दिली जाते. त्यातही काही तास विद्युत दुरुस्तीसाठी पुरवठा बंद असतो. म्हणजे शेतकऱ्याला जेमतेम चार पाच तास वीज मिळते. प्रत्यक्षात ७० ते ८० टक्के शेतकरी नोव्हेंबर ते जानेवारी फक्त तीन महिने विजेचा वापर करतात. इतर काळामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे वीजपंप बंद असतात. शेतकऱ्यांच्या नावावर ७५ हजार कोटी थकीत बिल दाखविण्यात येत आहेत. प्रत्यक्षात वर्षभराची बिले लावून ही थकबाकी दाखविण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी चार महिने वीज वापरली. त्याचे प्रत्यक्षात जर बिल दिले तर शेतकरी बिल भरू शकतात. परंतु न वापरलेले बिल माथी मारण्यात येत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पंपावर मीटर बसून वीजबिल आकारले तर शेतकऱ्याला वर्षाअखेर दोन तीन हजारांपेक्षा जास्त बिल देणे कठीण नाही.

प्रत्यक्षात वर्षभराची बिले लावून ही थकबाकी दाखविण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी चार महिने वीज वापरली. त्याचे प्रत्यक्षात जर बिल दिले तर आजही शेतकरी बिल भरू शकतात परंतु न वापरलेले विजेचे बिल शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. त्यामुळे हा सर्व गोंधळ असून याचा सर्व राजकीय पक्ष फायदा घेत आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पंपावर मीटर बसून वीजबिल आकारले तर शेतकऱ्याला वर्षाअखेर दोन तीन हजारांपेक्षा जास्त बिल देणे कठीण नाही. सर्व शेतकऱ्यांना मीटर देऊन बिल आकारणी केली तर हा गुंता लवकर सुटेल आणि शेतकऱ्यांच्या नावावर विजेचा जो भ्रष्टाचार चालतो तो बंद होईल.

भोसा येथील शेतकरी प्रभाकर खुरद म्हणाले, माझ्या गावातील माझ्यासह बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने प्रत्येकी एक ते दोन लाखापर्यंत खर्च करून रोहित्र घेतले. त्यावेळेस माहिती मिळाली की झालेल्या खर्च वीज बिलामधून कमी करून मिळेल आणि आता वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला जात आहेत. एव्हढा खर्च करून शेतकरी वीज आपल्या शेतात आणू शकतो तर वीजबिल भरणे त्यांच्यासाठी अवघड नाही. परंतु अश्वशक्तीनुसार योग्य ती बिले शेतकऱ्यांना दिली पाहिजेत आणि दिवसा कमीत कमी १२ तास वीज दिली पाहिजे. तसेच प्रत्येक रोहित्रावर अधिकृत जोडण्या पाचची क्षमता असताना अनधिकृतपणे दहा-दहा जोडण्या दिल्या जातात. याकडे कोणताही राजकीय पक्ष गांभीर्याने पाहत नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे कुठला पक्ष असेल तर तो आहे फक्त विरोधी पक्ष असतो. ही खरी कृषिप्रधान देशाची शोकांतिका आहे.

वीजबिले रिडिंग न घेता दिली  
वायरमन लोकांचे निरोप येत असून शेतातील बिल जर भरले नाही तर वीज पुरवठा बंद करण्याबाबत सांगत आहे. पण वीजबिल हे मीटर रीडिंग प्रमाणे नसून अवाजवी आहे. माझ्या शेतात नवीन छोटे रोहित्र बसवलेले असून वर्षातून फक्त तीन महिनेच माझ्या विहिरीला पाणी असते. इतर दिवस मोटर पूर्णपणे बंद असते तरीही मीटरचे रीडिंग न घेता सरासरी बिल वर्षाला नऊ हजार दिले जाते. १० एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला जेव्हढे बिल असते तितकेच दोन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला पण दिले जाते. यात बदल झाला पाहिजे, असे आडविहिर गावातील शेतकरी अमोल खर्चे म्हणाले.
 


इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...
विलंब ‘एफआरपी’चे व्याज  कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...
राज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...
द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...
यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी  आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...
कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...