सांगली, कोल्हापुरात कृषिपंपांची ९२६ कोटींची थकबाकी

सांगली ः महावितरणच्या कृषी धोरण २०२० अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील १ लाख ३० हजार ३८७ कृषिपंप ग्राहकांनी २२२ कोटी ७२ लाख रुपये चालू व थकीत वीज बिल भरले आहे.
Agricultural pumps in Sangli, Kolhapur Arrears of Rs 926 crore
Agricultural pumps in Sangli, Kolhapur Arrears of Rs 926 crore

सांगली ः महावितरणच्या कृषी धोरण २०२० अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील १ लाख ३० हजार ३८७ कृषिपंप ग्राहकांनी २२२ कोटी ७२ लाख रुपये चालू व थकीत वीज बिल भरले आहे. अद्यापही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील २ लाख ५४ हजार १३१ कृषिपंप ग्राहकांकडे ९२६ कोटी ६३ लाख रुपये चालू व थकीत वीज आहे. कृषी धोरणांतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या मुदतीत ५० टक्के थकीत वीजबिल भरल्यास ५० टक्के वीजबिल माफ होणार आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यात ७९ हजार १२१ कृषिपंप ग्राहकांनी  ७१ कोटी ६६ लाख, तर सांगली जिल्ह्यात ५१ हजार २६६ कृषिपंप ग्राहकांनी ५९ कोटी ५३ लाख रुपयांच्या वीजबिल थकबाकीचा भरणा केला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांनी अनुक्रमे ४१ कोटी ९७ लाख व ४९ कोटी ५६ लक्ष रुपयांचे चालू वीजबिल भरले आहे.

मधल्या काळात कोरोनाची दुसरी लाट, महापुरानंतर आता कृषिपंप ग्राहकांचा वीजबिल थकबाकीमुक्तीसाठी कृषी धोरणात सहभागी होण्याकडे कल वाढला आहे. मागील दोन महिन्यांत ३७ हजार ९२९ कृषिपंप ग्राहकांनी सहभाग नोंदवून १५ कोटी ८३ लक्ष ४४ हजार इतकी रक्कम भरली आहे.

थकबाकी मुक्तीच्या योजनेत चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणारे उच्चदाब, लघुदाब कृषिपंप ग्राहक आणि उपसा जलसिंचन योजना मुळ थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून उर्वरित ५० टक्केच्या माफीचा लाभ घेऊ शकतात. एक ते तीन वर्षांसाठी टप्प्याने योजनेत सहभाग घेतल्यास त्या त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के, तर तिसऱ्या वर्षात २० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. त्यासाठी कृषिपंप ग्राहकांनी चालू वीजबिले भरणे आवश्यक आहे.

२६२ कोटींचा निधी उपलब्ध

कृषी धोरणानुसार निर्लेखन, व्याज व विलंब आकार माफीनंतर सप्टेंबर २०२० अखेर २ लाख ३९ हजार ६६ ग्राहकांकडे १०५३ कोटी २० लाख रुपये थकबाकी आहे. कृषी ग्राहकांकडून भरणा झालेल्या रकमेच्या प्रत्येकी ३३ टक्के प्रमाणे रक्कम ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर कृषी आकस्मिक निधीत जमा केली जाईल.  ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण, विस्तारीकरणाची कामे होतील. सद्यःस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी १२८ कोटी ६ लाख, तर सांगलीला १५४ कोटी १४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com