Agriculture news in marathi, Of agricultural pumps in Sangli Power outage begins | Agrowon

सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरु

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

सांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी महावितरणने अचानक आक्रमक मोहीम सुरू केली आहे. बिलाची वसुली व्हावी, यासाठी थेट वीजजोडला पक्कड लावून ती तोडली जात आहेत.

सांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी महावितरणने अचानक आक्रमक मोहीम सुरू केली आहे. बिलाची वसुली व्हावी, यासाठी थेट वीजजोडला पक्कड लावून ती तोडली जात आहेत. आमचे नेमके बिल किती आहे, हे सांगा मग वसुलीला या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यातून रोज वाद सुरू झाले आहेत. शेतकरी आक्रमक आहेत. महावितरणने चालू बिल तरी भरा, अशी विनंती करत महावितरणच्या संकटाची आकडेवारीच समोर ठेवली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून कृषिपंपांच्या वीज बिलाबाबतची स्थिती अतिशय गोंधळाची आहे. शेतकऱ्यांना बिल मागितले नाही आणि त्यांनी भरले नाही, असे झाले आहे. आता अचानक वसुली मोहीम सुरु झाल्याने शेतकरी गोंधळले आहेत. नेमके बिल किती, ते योग्य आहे का, ते अति होते आहे का, असा प्रश्‍न सामान्य शेतकऱ्यांना पडणे सहाजिक होते. या परिस्थितीत महावितरणने शेतकऱ्यांची कोंडी करू नये, अशी मागणी होत आहे. 

वीजबिलाच्या थकबाकी मुक्ती योजनेत सहभाग नाही व चालू वीज बिलांचा देखील भरणा नाही, अशा शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू, असा इशारा आधी दिला होता. जिल्ह्यात कृषी धोरणानुसार ६० हजार ७९२ कृषिपंप ग्राहकांनी ११६ कोटी ५६ लाख रुपये चालू व थकीत वीजबिल भरणा केला आहे. भरणा झालेल्या रकमेच्या ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर कृषी आकस्मिक निधीत जमा केली जाणार आहे. अद्यापही जिल्ह्यातील २ लाक ३९ हजार कृषी ग्राहक थकबाकीत आहेत.

वीज बिलाच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने कृषी धोरण राबवले आहे. थकीत बिलाच्या ५० टक्के रक्कम भरून ५० टक्के वीज बिल माफीचा लाभ मिळू शकतो. सध्या चालू वीज बिल भरावे. त्यांची वीज तोडली जाणार नाही. चुकीची बिले असतील तर दुरुस्त करून दिली जातील.

- धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता.

ऐन द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांना खिंडीत गाठले जात आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे धोरण आहे. सरकारने शेतकऱ्यांची परीक्षा पाहू नये.

- रविकांत साळुंखे, शेतकरी, मल्लेवाडी.


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...