Agriculture news in marathi Agricultural service centers closed in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

पुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स सीडस् डिलर्स असोसिएशनने विविध मागण्यासाठी जाहीर केलेल्या तीन दिवसाच्या बंदला जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी प्रतिसाद देत केंद्रे बंद ठेवली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दुकांनामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

पुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स सीडस् डिलर्स असोसिएशनने विविध मागण्यासाठी जाहीर केलेल्या तीन दिवसाच्या बंदला जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी प्रतिसाद देत केंद्रे बंद ठेवली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दुकांनामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. सरकारने तातडीने मागण्यांची दखल घेण्याची मागणी कृषी सेवा केंद्र चालकांकडून होत आहे.

कृषी विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्यांकडून बियाणे सीलबंद स्थितीमध्ये खरेदी करून तसेच शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. खरीपात सोयाबीन व इतर बियाणे पेरणीनंतर उगवत नसल्याच्या कारणास्तव विक्रेत्यास जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत कृषी आयुक्तालयाकडून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

विक्रेता बियाणे उत्पादक, बियाणे प्रमाणीकरण करण्याचे काम करीत नसल्याने विक्रेत्यांवर या प्रकरणी गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही रद्द करावी. सोयाबीन बियाणे उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यापुढे शेतकऱ्यांना गुणवत्ता पूर्ण बियाणे मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विक्रेत्यांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावर अन्यायकारक कार्यवाही होत असल्याने तीन दिवस बंद पुकारण्यात आला आहे. त्यास पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील जवळपास सात हजार कृषी सेवा केंद्रांनी प्रतिसाद देऊन दुकाने बंद ठेवली. सकाळपासून दुकाने बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते व किटकनाशके मिळण्यास काही प्रमाणात अडचणी आल्या.      

पुणे जिल्हा डिलर असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोरे म्हणाले,`` जिल्हयात बंदला संपूर्ण जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवस बंद ठेवणार आहे. या काळात कोणतेही दुकानदार निविष्ठांची विक्री करणार नाहीत. सरकारने मागण्या मान्य न केल्यास राज्य संघटनेकडून पुढील आदेश मिळाल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. हा महाराष्ट्र राज्य असोसिएशनचा निर्णय आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी झालो आहोत.’’
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...