बुलडाणा जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे दिवसभर सुरू 

बुलडाणा ः खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रासाठी वेळ वाढवून दिली जावी, अशी मागणी जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादक संघटनेने केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आता सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी २३ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत कृषी सेवा केंद्रांची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.
Agricultural service centers open all day in Buldana district

लॉकडाऊन दरम्यान खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी सकाळी आठ ते १२ अशी कृषी केंद्रांची वेळ ठरविण्यात आली होती. मात्र, कृषी केंद्रावर बियाणे, खते आदी साहित्य दुपारनंतर येत असल्याने वेळ वाढविण्याची गरज होती. कृषी केंद्र धारकांना निर्धारीत वेळेत शेतकऱ्यांना मालाची विक्री तसेच येणारे बियाणे, खत ट्रकमधून साठवणूक करण्यात तासनतास वेळ लागत होता. 

यामुळे कृषी माल विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे कृषी सेवा केंद्र दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून आता कृषी केंद्र सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. यामुळे कृषी केंद्र संचालक तसेच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, असा दावा ॲड. देशमुख यांनी केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com