Agriculture news in Marathi Agricultural service centers should be allowed during lockdown | Page 2 ||| Agrowon

लॉकडाउन काळात कृषी सेवा केंद्रांना परवानगी द्यावी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 मार्च 2021

अत्यावश्यक सेवा म्हणून कृषी सेवा केंद्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाकडून करण्यात आली आहे.

अमरावती ः लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा म्हणून कृषी सेवा केंद्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाकडून करण्यात आली आहे. रब्बी हंगाम, कंपन्यांकडून होणारा खताचा पुरवठा, मृग बहरातील संत्र्याचे व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निविष्ठांची उपलब्धता करता यावी याकरिता हा निर्णय घेण्यात यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमरावती शहरासह काही तालुक्‍यांमध्ये सोमवार (ता. ८) पर्यंत लॉकडाउन लावण्यात आले आहे. या काळात किराणा, भाजीपाला या अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांचा देखील समावेश आहे. मात्र कृषी सेवा केंद्रासंदर्भातील बंदी निर्णयाचा फेरविचार करून त्यांना लॉकडाउन काळात व्यवसायाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने केली आहे.

संघाने दिलेल्या निवेदनानुसार, बियाणे व खते अत्यावश्‍यक सेवेत आहेत. याची मागणी शेतकऱ्यांकडून वर्षभर राहते. सध्या भाजीपाला, उन्हाळी भुईमूग, मूग या बियाण्यांची मागणी आहे. त्यासोबतच गहू, संत्रा, हरभरा व भाजीपाला या पिकांना खताचा डोस दिला जात आहे. खरीप नियोजन २०२१ करिता बियाणे नियोजन व सोयाबीन बियाण्यांच्या गाड्या उतरवून घेण्यासाठी दुकाने सुरू ठेवणे गरजेचे आहे.

या सर्व बाबींची दखल घेत त्यासोबतच खरीप २०२१ मध्ये निविष्ठा पुरवठ्याची साखळी विस्कळीत होऊ नये याकरिता लॉकडाउन काळात कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने केली आहे. सेवा संघाचे अध्यक्ष विलास इंगोले, कोशाध्यक्ष वीरेंद्र शर्मा, सचिव नीलेश गांधी यांच्या नेतृत्वात या संदर्भाने निवेदन देण्यात आले.


इतर बातम्या
पुसद तालुक्यात शेतकऱ्यांचा हिरवळीचे खत...श्रीरामपूर, जि. यवतमाळ  : रासायनिक खतांच्या...
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील ३८...सिंधुदुर्गनगरी ः अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा...
विजांच्या कडकडाटासह  सांगलीत मुसळधार...सांगली : कडेगाव तालुक्यासह शहरासह शुक्रवारी (ता....
‘पोकरा’अंतर्गत १८९ ग्राम कृषी संजीवनी...परभणी ः कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामसभा...
खानदेशात आठवडी बाजार निर्बंधासह सुरू कराजळगाव ः खानदेशात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहत...
वाशीममध्ये शेतकऱ्यांना  बियाणे, खते...वाशीम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी...
किराणा दुकान, भाजीपाला, डेअरी सुरू...वाशीम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी...
नगरमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत  फळे,...नगर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन...
सीनातून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडलेनगर  : कर्जत, श्रीगोंदे आणि आष्टी तालुक्‍...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...
शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा...कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल...
पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच...
सांगली जिल्ह्यात हळद लागवडीला प्रारंभ सांगली ः जिल्ह्यात अक्षय तृतीयेपासून हळद लागवडीस...
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
पंतप्रधान मोदींनी साधला लातूरमधील...लातूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील...
लहान मुलांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष...पुणे ः कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान...
अमरावतीत शेतीमाल विक्रीस गावबंदीअमरावती : कोरोनाचा प्रसार गावात झाल्यास त्याची...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
शेतकरी पुत्राने बनविले कांदा छाटणी यंत्रश्रीगोंदे, जि. नगर : श्रीगोंद्यातील शेतकऱ्याला...