Agriculture news in Marathi Agricultural service centers should be allowed during lockdown | Agrowon

लॉकडाउन काळात कृषी सेवा केंद्रांना परवानगी द्यावी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 मार्च 2021

अत्यावश्यक सेवा म्हणून कृषी सेवा केंद्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाकडून करण्यात आली आहे.

अमरावती ः लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा म्हणून कृषी सेवा केंद्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाकडून करण्यात आली आहे. रब्बी हंगाम, कंपन्यांकडून होणारा खताचा पुरवठा, मृग बहरातील संत्र्याचे व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निविष्ठांची उपलब्धता करता यावी याकरिता हा निर्णय घेण्यात यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमरावती शहरासह काही तालुक्‍यांमध्ये सोमवार (ता. ८) पर्यंत लॉकडाउन लावण्यात आले आहे. या काळात किराणा, भाजीपाला या अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांचा देखील समावेश आहे. मात्र कृषी सेवा केंद्रासंदर्भातील बंदी निर्णयाचा फेरविचार करून त्यांना लॉकडाउन काळात व्यवसायाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने केली आहे.

संघाने दिलेल्या निवेदनानुसार, बियाणे व खते अत्यावश्‍यक सेवेत आहेत. याची मागणी शेतकऱ्यांकडून वर्षभर राहते. सध्या भाजीपाला, उन्हाळी भुईमूग, मूग या बियाण्यांची मागणी आहे. त्यासोबतच गहू, संत्रा, हरभरा व भाजीपाला या पिकांना खताचा डोस दिला जात आहे. खरीप नियोजन २०२१ करिता बियाणे नियोजन व सोयाबीन बियाण्यांच्या गाड्या उतरवून घेण्यासाठी दुकाने सुरू ठेवणे गरजेचे आहे.

या सर्व बाबींची दखल घेत त्यासोबतच खरीप २०२१ मध्ये निविष्ठा पुरवठ्याची साखळी विस्कळीत होऊ नये याकरिता लॉकडाउन काळात कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने केली आहे. सेवा संघाचे अध्यक्ष विलास इंगोले, कोशाध्यक्ष वीरेंद्र शर्मा, सचिव नीलेश गांधी यांच्या नेतृत्वात या संदर्भाने निवेदन देण्यात आले.


इतर बातम्या
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...