Agriculture News in Marathi Agricultural stocks, mortgage loans, Blockchain information directly on the dam | Page 3 ||| Agrowon

शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची माहिती थेट बांधावर

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन योजना, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे वखार आपल्या दारी अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये कार्याशाळांद्वारे राबविण्यात येत आहे.

पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन योजना, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे वखार आपल्या दारी अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये कार्याशाळांद्वारे राबविण्यात येत आहे, अशी माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली.

तावरे म्हणाले, ‘‘शेतकरी विविध तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतमालाचे भरघोस उत्पादन घेत आहे. सध्या काढणीचा हंगाम असून, बाजारपेठेत अचानक मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक होऊन दर पडण्याची शक्यता असते. यामध्ये शेतकऱ्यांकडे दर्जेदार शेतीमाल असून, सुद्धा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान एका एका पिकाचा विचार केला तर ते कोट्यवधी रुपयांचे होते. हे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शेतीमाल साठणूक, बाजारपेठेच्या अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) शेतीमाल विक्री कधी आणि केव्हा करावी या बाबतची माहिती कार्यशाळांमधून दिली जाणार आहे. यामध्ये राज्य वखार महामंडळाची शेतीमाल साठवणूक योजना, तारण कर्ज योजना, ब्लॉकचेन योजना, लहान साठवणूक केंद्रे (वखार) बांधणी योजना आदी विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.’’

  ...येथे होतील कार्यशाळा
या कार्यशाळा उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, वाशीम, खामगाव (बुलडाणा), अकोला, दर्यापूर (अमरावती), यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव (गोंदिया), तुमसर (भंडारा) आदी ठिकाणी होणार आहेत. कार्यशाळेबाबत भाऊ टेमकर (९४२२८७५९५६), एस. पी. बोरसे (नागपूर - ९१५८००१३१५), ए. डी. मासाळ (अमरावती - ९९६७२८९९९३) के. आर. पवार (लातूर - ९१५८००१३४०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वखार महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. 


इतर बातम्या
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणी पोहोचली ३१...नगर ः रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा...
सातारा जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर...
रब्बी, उन्हाळी हंगामांत पिकांखालील...वर्धा : या वर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये...
सोलापूर :शेतकऱ्यांना दुधाळ गाई,...सोलापूर : पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-...
वीज प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढणार...वाशीम : जिल्ह्यात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर...