कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्र

पुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या त्यांच्या गावी कार्यरत आहेत.स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
Pusegaon (Dist. Satara): Students of Agricultural College while guiding farmers.
Pusegaon (Dist. Satara): Students of Agricultural College while guiding farmers.

पुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या त्यांच्या गावी कार्यरत आहेत. ग्रामीण जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या मिनाक्षी हणमंत पवार ही पुसेगाव (ता.खटाव जि.सातारा) येथे कार्यरत आहे. सध्या गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे. माती परीक्षणाचे फायदे, निंबोळी अर्क निर्मिती, बीजप्रक्रिया, पशुखाद्य प्रक्रिया, बोर्डो पेस्टचा वापर, कीडनाशकांची फवारणीवेळी घ्यावयाची काळजी, तण व्यवस्थापन आदी विषयांबाबत तिने प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली आहे. जैविक पद्धतीने कीड व्यवस्थापनाबद्दल कृषी सहायक एच.बी. भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.कृषी कार्यानुभव उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस. कदम, प्रा. डॉ. एस.आर. दिवाळे, प्रा. सूर्यवंशी, प्रा. मोहिरे, प्रा. जाधव यांचे मार्गदर्शन विद्यार्थांना मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com