agriculture news in marathi Agricultural students introducing new agricultural techniques to farmers | Agrowon

कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्र

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

पुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या त्यांच्या गावी कार्यरत आहेत. स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

पुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या त्यांच्या गावी कार्यरत आहेत. ग्रामीण जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या मिनाक्षी हणमंत पवार ही पुसेगाव (ता.खटाव जि.सातारा) येथे कार्यरत आहे. सध्या गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे. माती परीक्षणाचे फायदे, निंबोळी अर्क निर्मिती, बीजप्रक्रिया, पशुखाद्य प्रक्रिया, बोर्डो पेस्टचा वापर, कीडनाशकांची फवारणीवेळी घ्यावयाची काळजी, तण व्यवस्थापन आदी विषयांबाबत तिने प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली आहे.
जैविक पद्धतीने कीड व्यवस्थापनाबद्दल कृषी सहायक एच.बी. भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.कृषी कार्यानुभव उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस. कदम, प्रा. डॉ. एस.आर. दिवाळे, प्रा. सूर्यवंशी, प्रा. मोहिरे, प्रा. जाधव यांचे मार्गदर्शन विद्यार्थांना मिळत आहे.


इतर कृषी शिक्षण
कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...
मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...
सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
पीक अवस्थेनुसार जाणून घ्या तापमानमहाराष्ट्र राज्य हे भौगोलिक क्षेत्रानुसार देशात...
पाण्याचे महत्त्व जाणून संवर्धनासाठी...जागतिक हवामान संघटनेने २०२० हे वर्ष ‘जागतिक...
पूर्व विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात...महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचा दाब कमी होत...
दुधापासून व्होडका होतेय अमेरिकेत...दूध हे तुलनेने फारच कमी काळासाठी टिकवून ठेवता...
नत्रयुक्त खतांचा वापर व्हावा अधिक...पर्यावरण आणि हरितगृह वायू म्हटले की आपल्याला...