कृषी विद्यापीठ देणार कोरडवाहू शेतीसाठी गवारगमचा पर्याय
कृषी विद्यापीठ देणार कोरडवाहू शेतीसाठी गवारगमचा पर्याय

कृषी विद्यापीठ देणार कोरडवाहू शेतीसाठी गवारगमचा पर्याय

अमरावती ः कोरडवाहू शेती आणि शेतकऱ्यांसाठी पर्याय देण्याच्या प्रयत्नाअंतर्गंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गवारगमची चाचणी घेतली जात आहे. देशभरातील वीस वाणांची लागवड या अंतर्गत करण्यात आली आहे. 

राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात गवारगमची खरिपात  मोठ्या क्षेत्रावर लागवड होते. ११० ते  १२० दिवसांचे पीक आहे. काही वाण तर ९० दिवसाचे पण आहेत. एकरी चार क्‍विंटल पर्यंत उत्पादकता मिळते. कमी पाण्याचे हे पीक असून उन्हाळ्याच्या काळात महिन्याला अवघ्या दोन पाण्याची गरज राहते. कृषी विद्यापीठाच्या चाचणीत उन्हाळी, खरीप दोन्हीसाठी हे पीक शिफारसीत आहे. राजस्थानमध्ये केवळ खरिपात घेतात. आर्द्रता कमी असलेल्या भागात देखील हे पीक येऊ शकते. 

हेक्‍टरी १५ ते १६ किलो बियाण्याची गरज भासते. बियापासून पावडर तयार करून बारीक पावडर त्यापासून गम सारखा चिकट पदार्थ मिळतो. या चिकट गमचा आईस्क्रीम व अन्य पदार्थात वापर केल्यास त्या पदार्थांची टिकवण क्षमता वाढीस लागते. खाद्य पदार्थांच्या चवीत आणि  गुणधर्मात कोणताच बदल होत नाही. यंत्रात लुब्रीकंट म्हणून देखील या गमचा वापर होतो. या लुब्रीकंटचे वैशिष्ट्य म्हणजे ५०० डिग्री सेल्‍सिअस तापमानातही त्यांचा चिकटपणा कायम राहू शकतो. त्यामुळे गवारगमला जागतिकस्तरावर मागणी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ग

म काढल्यानंतर चुऱ्याचा वापर जनावरांसाठी खाद्य म्हणूनदेखील होऊ शकतो. गवारगवमचे ८० टक्‍के उत्पादन भारत करतो, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. भारतात केवळ कच्चा माल उत्पादन होते. त्याची आयात करून मग चीन त्यावर प्रक्रिया करून जादा पैसे कमावतो, असेही विद्यापीठ तज्ज्ञांनी सांगितले. 

विद्यापीठात होत आहेत ट्रायल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या कोरडवाहू पिकाकडे विदर्भातील शेतीला पर्याय म्हणून लक्ष्य केंद्रीत केले आहे. कुलगुरू डॉ. विलास भाले, भाजीपाला विभागाचे प्रमुख डॉ. सोनकांबळे, डॉ. विजय काळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या सहा वर्षांपासून गवारगमच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. देशभरातून ९० वाण आणण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com