‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न शाखांतील पदवीधरांनाच संधी द्या 

शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबत धोरण ठरवण्यात आले आहे. या अंतर्गत विषय शिक्षक म्हणून फक्त कृषी व संलग्न शैक्षणिक पार्श्‍वभूमी असणाऱ्याच पदवीधरांना शिक्षक म्हणून संधी मिळावी.
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न  शाखांतील पदवीधरांनाच संधी द्या  Agriculture as ‘agriculture’ teacher, attached Give opportunities only to the graduates in the branches
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न  शाखांतील पदवीधरांनाच संधी द्या  Agriculture as ‘agriculture’ teacher, attached Give opportunities only to the graduates in the branches

कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबत धोरण ठरवण्यात आले आहे. या अंतर्गत विषय शिक्षक म्हणून फक्त कृषी व संलग्न शैक्षणिक पार्श्‍वभूमी असणाऱ्याच पदवीधरांना शिक्षक म्हणून संधी मिळावी, अशी मागणी कोल्हापूर कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. या बाबतचे निवेदन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांना गारगोटी येथे देण्यात आले. संघटनेचे संस्थापक जयदीप ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. येत्या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. या निर्णयाचे राज्यातील सर्व कृषी व संलग्न शाखांतील पदवीधरांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे संघटना समन्वयक अक्षय सावंत यांनी या वेळी सांगितले. राज्य सरकारच्या निर्णयाने राज्याच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याची क्षमता आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये शेती क्षेत्राची आवड निर्माण होऊन नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले जाईल. या निर्णयाचा लाभ राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना होईल, असे प्रज्योत इंदुलकर व वीरसिंग कुंभार यांनी सांगितले. या वेळी संघटना प्रतिनिधी विकास घरपणकर, प्रशांत बुवा, रोहन चव्हाण, शुभम पाटील, विशाल शिंदे आदी कृषी पदवीधर उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com