Agriculture News in Marathi Agriculture as ‘agriculture’ teacher, attached Give opportunities only to the graduates in the branches | Page 2 ||| Agrowon

‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न शाखांतील पदवीधरांनाच संधी द्या 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबत धोरण ठरवण्यात आले आहे. या अंतर्गत विषय शिक्षक म्हणून फक्त कृषी व संलग्न शैक्षणिक पार्श्‍वभूमी असणाऱ्याच पदवीधरांना शिक्षक म्हणून संधी मिळावी.

कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबत धोरण ठरवण्यात आले आहे. या अंतर्गत विषय शिक्षक म्हणून फक्त कृषी व संलग्न शैक्षणिक पार्श्‍वभूमी असणाऱ्याच पदवीधरांना शिक्षक म्हणून संधी मिळावी, अशी मागणी कोल्हापूर कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. या बाबतचे निवेदन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांना गारगोटी येथे देण्यात आले.

संघटनेचे संस्थापक जयदीप ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. येत्या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. या निर्णयाचे राज्यातील सर्व कृषी व संलग्न शाखांतील पदवीधरांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे संघटना समन्वयक अक्षय सावंत यांनी या वेळी सांगितले.

राज्य सरकारच्या निर्णयाने राज्याच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याची क्षमता आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये शेती क्षेत्राची आवड निर्माण होऊन नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले जाईल. या निर्णयाचा लाभ राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना होईल, असे प्रज्योत इंदुलकर व वीरसिंग कुंभार यांनी सांगितले.

या वेळी संघटना प्रतिनिधी विकास घरपणकर, प्रशांत बुवा, रोहन चव्हाण, शुभम पाटील, विशाल शिंदे आदी कृषी पदवीधर उपस्थित होते. 


इतर बातम्या
जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार...जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १...
जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून...जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत ...कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५...नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात...
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत...सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...