विषबाधाप्रकरणी कृषिमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर टीकास्त्र
विषबाधाप्रकरणी कृषिमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर टीकास्त्र

विषबाधाप्रकरणी कृषिमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर टीकास्त्र

कीडनाशकाच्या फवारणीमुळे नाही तर ही एकप्रकारे प्रशासनिक हत्याच आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल रुग्णालयात तत्काळ गेले. परंतु १८ बळी आणि ५०० पेक्षा अधिक बाधित असताना कृषिमंत्री, प्रधान सचिव, आरोग्यमंत्री यांना यवतमाळला येण्यासाठी वेळ नाही. आणखी किती बळी गेले म्हणजे ते यवतमाळला येतील? - किशोर तिवारी , अध्यक्ष, (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन (राज्यमंत्री दर्जा)

यवतमाळ : कृषिमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या डोक्‍यात सत्ता गेली आहे. त्यामुळे इतक्‍या व्यक्‍तींचे जीव गेले असताना, हे दोघेही यवतमाळकडे फिरकले नाहीत, अशी घणाघाती टीका करीत (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

तिवारी यांनी विषबाधा प्रकरणात उद्विग्न होत माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. त्या वेळी राज्यमंत्री दर्जा म्हणजे सरकारचा भाग असताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर थेट हल्लाबोल केला.

जिल्ह्यातील विषबाधा प्रकरणातील मृत्युमागे प्रशासकीय उदासीनता कारणीभूत आहे. त्यामुळे या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, कीडनाशक कंपन्या आणि त्यावर नियंत्रण ठेवणारे कृषी अधिकारी यांच्यावर दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी श्री. तिवारी यांनी केली.

या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर या प्रकरणी न्यायासाठी प्रसंगी कोर्टातही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी, आरोग्य आणि महसूलच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ प्रभावाने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. विषबाधेमुळे मरणारे हे आदिवासी असल्याने त्यांचा आवाज उठवणारे कोणी नसल्याने हे प्रकरण गंभीरतेने घेतलेच गेले नाही, असाही आरोप त्यांनी केला.

प्रधान सचिव यूपी-बिहारचे राज्यात विविध खात्यांचे सचिव हे उत्तर प्रदेश, बिहारचे आहेत. त्यामुळेच त्यांची नाळ महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर किंवा सामान्यांशी जुळली नाही. परिणामी इतके लोक मरत असताना उपाययोजना किंवा निर्देश देण्याकरिता तेदेखील तत्काळ जिल्ह्यात आले नाहीत. यावरूनच अशा लोकांच्या महाराष्ट्राप्रतीच्या भावना स्पष्ट होतात, असाही आरोप त्यांनी केला. कृषी खात्याच्या प्रधान सचिवांवरदेखील त्यांनी टीका केली.

मृतकांना मदतीसाठी प्रयत्न विषबाधेमुळे दगावलेल्या व्यक्‍तींना मदत, तसेच उपचार सुरू असलेल्या व्यक्‍तींनादेखील मदतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आता १८ जणांचे बळी गेल्यानंतर अँटिडोस सगळ्या रुग्णालयात ठेवण्यात आले असून, सगळ्या ठिकाणी प्रतिबंधात्मक किट ठेवण्यात आल्या आहेत. परंतु या साऱ्या उपाययोजनांचा फायदा काय, असा प्रश्‍न तिवारी यांनी केला.

बीटी तंत्रज्ञानाचा फायदा काय? बीटी तंत्रज्ञान जर कीडरोगाला बळी पळत असेल, तर या तंत्रज्ञानाचा फायदा, तोट्याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या शेतकरी बळी घेणाऱ्या तंत्रज्ञानाला काही अधिकारी पाठीशी घालत आहेत, असाही घणाघाती आरोप किशोर तिवारी यांनी केला. राज्यात काही कंपन्यांवर बंदी घालण्यात आली. परंतु बीटीवर आज राज्यात सरसकट बंदीची गरज आहे.

कीडनाशकाचा खप ५०० कोटी रुपये ५०० कोटी रुपयांच्या वर कीटकनाशकाचा खप असताना, या कंपन्यांकडून कोणतेच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कीडनाशक कंपन्यादेखील या मृत्यूला तितक्‍याच कारणीभूत आहेत. सत्ता डोक्‍यात गेली आहे. कंपन्यांवर कोणाचे नियंत्रण आहे, कृषी अधिकारी काय करतात, असा सवाल तिवारी यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com