agriculture news in marathi, agriculture assistant, village sevak will provide one day salary to flood victims, buldhana, maharashtra | Agrowon

कृषी सहायक, ग्रामसेवक देणार पूरग्रस्तांना एक दिवसाचे वेतन
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

संघटनेच्या सदस्यांनी एक दिवसाचे वेतन देऊ करीत आपली सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. संघटनेचे सदस्य मदत कार्यासाठी सुद्धा गरजेनुसार तयार आहेत. 
-धनजंय सोनुने, कार्याध्यक्ष, बुलडाणा

अकोला : राज्यातील पूरस्थितीच्या संकटात नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने एक दिवसाने वेतन देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्यावतीने पत्र पाठविण्यात आले आहे. राज्यात कार्यरत १० हजार कृषी सहायक हे ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून मदत करणार आहेत.
तसेच, राज्यातील २२ हजार ग्रामसेवक सुद्धा आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना देणार आहेत. याबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी पत्र पाठवले आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगलीसह इतर भागांत पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत कृषी सहायक संघटनेने कृषी विभागात कार्यरत दहा हजार कृषी सहायकांचे एक दिवसाचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तसे पत्र पाठविले आहे. यासोबतच आवश्यकतेप्रमाणे मदतकार्यात योगदान देण्याचेही संघटनेने म्हटले आहे. ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून ही रक्कम मुख्यमंत्री मदतनिधी खात्यात वर्ग करण्याची विनंती करण्यात आली आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...