agriculture news in marathi, agriculture assistent refuse to give proper sowing report, buldhana, maharashtra | Agrowon

अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः कृषी सहायकांचे निवेदन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा शेतकरीनिहाय व सर्व्हे नंबरनिहाय पीक पेरणीचा अचूक अहवाल देणे शक्य नसल्याने हे काम कृषी सहायक संघटना करणार नाही, अशा आशयाचे निवेदन कृषी सहायक संघटनेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांना दिले आहे.

बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा शेतकरीनिहाय व सर्व्हे नंबरनिहाय पीक पेरणीचा अचूक अहवाल देणे शक्य नसल्याने हे काम कृषी सहायक संघटना करणार नाही, अशा आशयाचे निवेदन कृषी सहायक संघटनेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांना दिले आहे.

अचूक पीक पेरणी अहवालाबाबत २० जून २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले पत्र जिल्हा अधीक्षक कार्यालयाने कृषी सहायकांना बजाविले होते. त्यानुसार कृषी सहायक व तलाठी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अचूक पीक पेरणी अहवाल दर सोमवारी सादर करण्याचे कळविण्यात आले होते. शेतकरीनिहाय, सर्व्हे नंबरनिहाय हा अहवाल देण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, हे काम शक्य नसल्याने याला संघटनेने नकार दिला आहे.

संघटनेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कृषी सहायकांना प्रक्षेत्रावर काम करीत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचीही मागणी केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास रिंढे, कार्याध्यक्ष दीपक बोरे, कोशाध्यक्ष काकासाहेब दळवी, सचिव रवी गवई, राज्य कार्यकारिणी सदस्य धनंजय सोनुने, चंदा नवले आदींच्या नावे हे निवेदन देण्यात आले आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

  • ग्रामपंचायतस्तरावर कृषी सहायकांचे कार्यालय सुरू करताना हे कार्यालय ग्रामसेवक तथा तलाठ्याप्रमाणेच गावच्या ठिकाणी किंवा मुख्यालयातील एका गावातच ठेवावे. 
  • कृषी सहायकांकडे विविध गावांचा प्रभार असतो. अशा वेळी प्रत्येक गावात हे कार्यालय सुरू केल्यास प्रक्षेत्रावर काम करता येणार नाही. 
  •  ग्रामपंचायतस्तरावर कार्यालय सुरू करण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकला जात आहे, हे योग्य नाही. 
  • कार्यालय अधिकृतपणे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही पूर्णपणे वरिष्ठस्तरावरून व्हावी व त्याबाबत कृषी सहायकांना कार्यालय उपलब्ध झाल्याचे लेखी पत्राद्वारे सूचित करावे.  
  • कार्यालय सुरू करताना तेथे टेबल, खुर्च्या, कपाट, संगणक, प्रिंटर, कार्यालयीन कामकाजासाठी लागणारे साहित्य आणि वीजपुरवठ्याचीही सोय व्हावी. 
  • जिल्ह्यात करण्यात आलेल्या प्रतिनियुक्त्या कृषी सहसंचालकांच्या पत्रानुसार तातडीने रद्द कराव्यात. 
  • मुख्यालयातील प्रत्येक गावात स्वतंत्र कृषिमित्र उपलब्ध व्हावा. 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...