कृषी, ग्रामविकासावर आधारित प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू

नाशिक : ‘कृषी व पूरक व्यवसाय, ग्रामविकास, रोजगार निर्मितीला चालना मिळावी, यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
Agriculture, based on rural development Certificate course started
Agriculture, based on rural development Certificate course started

नाशिक : ‘‘कृषी व पूरक व्यवसाय, ग्रामविकास, रोजगार निर्मितीला चालना मिळावी, यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने काम करण्यास इच्छुक घटकांना मार्गदर्शन करण्यासह शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ६ महिने कालावधीचे पाच प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू केले आहेत’’, अशी माहिती विद्यापीठाच्या सहयोग व विशेष उपक्रम केंद्राचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे यांनी दिली. 

विद्यापीठाच्या सहयोग व विशेष उपक्रम केंद्राने शेतकरी उत्पादक कंपनी, ग्रामरोजगार सेवक कौशल्य, मधुमक्षिकापालन, सुरक्षा रक्षक, सुरक्षा अधिकारी, रस्ते परिवहन आणि सुरक्षा हे ऑनलाइन प्रमाणपत्र शिक्षणक्रम विकसित केले आहेत. १ जानेवारीपासून प्रवेश सुरू झाले आहेत. ३१ जानेवारीपर्यंत मुदत आहे. 

शेतकऱ्यांस यांत्रिकीकरण, प्रक्रिया, मूल्यवर्धन, विपणन, निविष्ठा खरेदी इत्यादीद्वारा उत्पादन खर्च करताना व्यक्तिगत पातळीवर अनेक मर्यादा आहेत. म्हणून शेतकरी गटाच्या कंपनीच्या माध्यमातून एकत्रित येऊन जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यास व शेती व्यवसाय किफायतशीर करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात शासनाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाबार्ड यांद्वारे छोट्या शेतकऱ्यांच्या गटांना एकत्रित करून त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यावर भर दिला आहे. 

सरकारने ''हनी मिशन योजना''(मधुक्रांती) सुरु केल्यामुळे देशात मधुमक्षिकापालन जैव तंत्रज्ञानास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुक्त विद्यापीठाने मधुमक्षिका पालन कौशल्य प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरु करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत या विषयाचे महत्त्व या अभ्यासक्रमाद्वारे पोचविण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संकेत स्थळावरिल माहितीनुसार राज्यात एकूण ३४ जिल्ह्यात ३५१ तालुक्यामध्ये२८ हजार ५०४ ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये एक ग्राम रोजगार सेवक आहे. या अनुषंगाने आदिवासी भागात २ सेवक नेमण्यास सुचविले आहे. त्यामुळे ग्रामरोजगार सेवक कौशल्य अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले. 

४७ अभ्यास केंद्रांना परवानगी 

राज्यभरात एकूण४७ केंद्रांना परवानगी देण्यात आली. त्यासाठी २५८ प्रवेश अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com