agriculture news in Marathi agriculture bills passed in Rajyasabha Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

तिशय अभूतपूर्व गोंधळात कृषीविषयक दोन विधेयके राज्यसभेत रविवारी (ता.२०) आवाजी मतदानाने मंजूर झाली.

नवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की, अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उतरलेले विरोधी पक्षांचे सदस्य, कागदपत्रांची फाडाफाडी व पुस्तके उपसभापतींच्या अंगावर फेकून मारणे, सुमारे ६० मार्शलची सभागृहातील तैनाती, त्यांच्यासह महिला सुरक्षा रक्षकांनी सभापतींच्या आसनाला केलेले कडे, काही विरोधी नेत्यांची उपसभापतींबरोबर झालेली शारीरिक झटापट, सभापतींच्या आसनासमोरील माईक तोडण्याचा प्रयत्न, सरचिटणीसांच्या टेबलवर चढून दिलेल्या घोषणा व त्या देणाऱ्या खासदारांना ८-१० मार्शलनी अक्षरशः उचलून खाली उतरणे या अतिशय अभूतपूर्व गोंधळात कृषीविषयक दोन विधेयके राज्यसभेत रविवारी (ता.२०) आवाजी मतदानाने मंजूर झाली.  

राज्यसभेत इतक्‍या प्रचंड संख्येने मार्शलना तैनात करून विधेयक मंजूर करवून घेण्याचा महिला आरक्षण विधेयकानंतरचा हा पहिलाच प्रसंग ठरला. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी रविवारी कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक, २०२० आणि शेतकरी (सक्षणीकर व संरक्षण) किंमती हमी व कृषी सेवा करार विधेयक, २०२० राज्यसभेत सादर केली. त्यावर साडेतीन तासांची चर्चाही झाली.

मात्र जेव्हा विधेयके मंजूर करण्याची वेळ आली तेव्हा कामकाजाची वेळ वाढवण्यास कॉँग्रेससह विरोधकांनी तीव्र विरोध केला. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की जेव्हा सभागृहाची वेळ वाढवायची असते तेव्हा संसदीय परंपरेप्रमाणे संख्येच्या नव्हे तर, सर्वसहमतीच्या आधारे ती वाढवावी लागते. विरोधी पक्षांचा याला एकमुखी विरोध असल्याने सरकारने उद्या विधेयकांना मंजुरी घ्यावी. मात्र सरकारकडून याला तीव्र विरोध झाला.

उपसभापतींशी झटापट 
तोमर यांनी आपले उत्तराचे भाषण पुढे सुरू ठेवल्याने संतापलेल्या कॉँग्रेस, तृणमूल कॉँग्रेस, आम आदमी पक्ष व बहुतांश विरोधी पक्षांचे सदस्य घोषणा देत सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उतरले. उपसभापती हरिवंश यांनी विधेयकांना मंजुरी घेण्यास सुरवात करताच गोंधळ अधिक वाढला. कॉँग्रेसचे जयराम रमेश व तृणमूलचे डेरेक ओब्रायन हे हरिवंश यांच्याजवळ जाऊन जोरजोरात वाद घालू लागले. ‘‘तुम्ही हे काय चालविले आहे?,’’ असे म्हणत ओब्रायन यांनी हरिवंश यांच्याशी शारीरिक झटापट केली तर, माकपचे एल्लमारम करीम यांनी त्यांच्यासमोरील माईक तोडण्याचा प्रयत्न केला. डोला सेन, संजय सिंह, राजीव सातव आदींनी विधेयक व अन्य कागदपत्रे फाडून त्यांचे तुकडे हवेत भिरकावले. 

 प्रतिक्रिया
लोकशाहीतील हा अतिशय दुःखद दिवस आहे. सरकारकडे संख्याबळ नसल्यानेच घटना विरोधी मार्गाने विधेयके मंजूर करण्याचा प्रकार घडला. सभागृहाची वेळ वाढविण्याचा निर्णय दुर्दैवी होता. सभागृहातील सारे चित्रण आमच्याकडे आहे. आम्ही कोणताही नियम तोडलेला नाही. 
- डेरेक ओब्रायन, खासदार, तृणमूल काँग्रेस 

उपसभापतींवर हल्ला करण्याचा कॉँग्रेस व मित्रपक्षांचा प्रकार निंदनीय होता व राज्यसभा सभापतींनी बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. संख्याबळ नसल्याने कॉँग्रेस गुंडगिरीवर उतरली. 
- जे. पी. नड्डा, अध्यक्ष, भाजप


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...