नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
अॅग्रो विशेष
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीर
कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा एमएचटी सीईटीचा निकाल नुकताच (ता. २८) जाहीर केला.
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन एन्ट्रास टेस्ट सेल’मार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा एमएचटी सीईटीचा निकाल नुकताच (ता. २८) जाहीर केला. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सूत्रांनी दिली.
राज्यात एमएचटी सीईटी २०२० या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी विधायक अभ्यासक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जात आहे. कृषीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑक्टोबर महिन्यात सीईटी घेण्यात आली होती. राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी १८७ परीक्षा केंद्रांवर आणि राज्याबाहेरील १० अशा एकूण १९७ परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने १६ दिवसांत ३२ सत्रांमध्ये घेण्यात आली. एकूण नोंदणीच्या तुलनेत राज्यात जवळपास ७१ टक्के विद्यार्थी परीक्षेस बसले होते.
एमएचटी सीईटीच्या ऑनलाइन परीक्षेत राज्यात पीसीएम गटांमध्ये २२ विद्यार्थी, तर पीसीबी गटामध्ये १९ विद्यार्थी प्रथम आले आहेत. परीक्षेसाठी बसलेल्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून mhtcet२०२०.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून पाहता येणार आहे.
याशिवाय स्कोर कार्डही डाउनलोड करता येणार असून, तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जाहीर केलेल्या निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या नऊ विद्याशाखांच्या अभ्यासक्रमासाठी राज्यात एकूण १५ हजार २२७ जागा आहेत.
परीक्षेस बसलेले विद्यार्थी...
नोंदणी | पाच लाख ४२ हजार ४३१ |
परीक्षेस उपस्थित | ३ लाख ८६ हजार ६०४ |
परीक्षेस अनुपस्थित | एक लाख ५५ हजार ८२७ |
गटनिहायमध्ये पीसीएम विषय | एक लाख ७४ हजार ६७९ |
पीसीबी विषयात | दोन लाख ११ हजार ९२५ |
खुला वर्ग | एक लाख २ हजार ६७४ |
राखीव वर्ग | दोन लाख ८३ हजार ९३० |
विद्यार्थिनी | एक लाख ६४ हजार २१ |
विद्यार्थी | दोन लाख २२ हजार ५६३ |
- 1 of 654
- ››