agriculture news in marathi agriculture CET result Declared | Agrowon

कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा एमएचटी सीईटीचा निकाल नुकताच (ता. २८) जाहीर केला.

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन एन्ट्रास टेस्ट सेल’मार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा एमएचटी सीईटीचा निकाल नुकताच (ता. २८) जाहीर केला. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सूत्रांनी दिली.

राज्यात एमएचटी सीईटी २०२० या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी विधायक अभ्यासक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जात आहे. कृषीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑक्टोबर महिन्यात सीईटी घेण्यात आली होती. राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी १८७ परीक्षा केंद्रांवर आणि राज्याबाहेरील १० अशा एकूण १९७ परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने १६ दिवसांत ३२ सत्रांमध्ये घेण्यात आली. एकूण नोंदणीच्या तुलनेत राज्यात जवळपास ७१ टक्के विद्यार्थी परीक्षेस बसले होते. 

एमएचटी सीईटीच्या ऑनलाइन परीक्षेत राज्यात पीसीएम गटांमध्ये २२ विद्यार्थी, तर पीसीबी गटामध्ये १९ विद्यार्थी प्रथम आले आहेत. परीक्षेसाठी बसलेल्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून mhtcet२०२०.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून पाहता येणार आहे.

याशिवाय स्कोर कार्डही डाउनलोड करता येणार असून, तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जाहीर केलेल्या निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या नऊ विद्याशाखांच्या अभ्यासक्रमासाठी राज्यात एकूण १५ हजार २२७ जागा आहेत.

परीक्षेस बसलेले विद्यार्थी...

नोंदणी  पाच लाख ४२ हजार ४३१ 
परीक्षेस उपस्थित  ३ लाख ८६ हजार ६०४ 
परीक्षेस अनुपस्थित  एक लाख ५५ हजार ८२७
गटनिहायमध्ये पीसीएम विषय  एक लाख ७४ हजार ६७९
पीसीबी विषयात दोन लाख ११ हजार ९२५
खुला वर्ग  एक लाख २ हजार ६७४
राखीव वर्ग  दोन लाख ८३ हजार ९३०
विद्यार्थिनी  एक लाख ६४ हजार २१
विद्यार्थी  दोन लाख २२ हजार ५६३

 


इतर बातम्या
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...