agriculture news in marathi, agriculture commissioner gives intimation to officers, yavatmal, maharashtra | Agrowon

कामचुकार कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करू : कृषी आयुक्त
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

कृषी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना शेताच्या बांधावर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोण किती कार्यरत आहेत, हे तपासण्यासाठी ही भेट होती.  - सचिंद्र प्रताप सिंह, कृषी आयुक्त.

यवतमाळ   : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोंड अळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरही जे अधिकारी, कर्मचारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला.

कृषी आयुक्त संचिद्र प्रताप सिंह यांनी नुकताच जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या वर्षीपासून कापसावर झालेला गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव, त्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा कृषी आयुक्तांनी घेतला.

यंदा सुरवातीला बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे कृषी विभागातील अधिकाऱ्यांपासून, कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्याचे आदेश कृषी आयुक्त सिंह यांनी दिले होते. त्यांचे बऱ्यापैकी सकारात्मक प्रतिसाद दिसत आहेत. मात्र, बोंड अळीचा प्रादुर्भाव सप्टेंबर, ऑक्‍टोंबर महिन्यात होण्याची शक्‍यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी कृषी आयुक्तांनी जिल्ह्याचा दौरा केला. कृषी अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचे आदेश सिंह यांनी दिले.

कृषी विभागाने सुरू केलेल्या अभियानाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. यानंतरही कृषी अधिकाऱ्यांनी सजग राहून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे आदेश कृषी आयुक्तांनी दिले. ज्या ठिकाणी आदेशाचे पालन होणार नाही, कामचुकारपणा होईल अशांना ही शेवटची संधी असल्याचा इशारा कृषी आयुक्तांनी दिला.

जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर कृषी आयुक्त सिंह यांची वर्धा येथे बैठक होती. बैठकीसाठी जात असताना त्यांनी यवतमाळ-कळंब मार्गावरील दोन शेतात भेट देत पिकांची पाहणी केली. पीक परिस्थिती, बोंड अळी, शेतकऱ्यांपर्यंत कृषी अधिकारी येत आहेत की नाही, याची चौकशी केली.
 

इतर अॅग्रो विशेष
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
फूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...
पुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...