शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
अॅग्रो विशेष
कृषी आयुक्त थेट बांधावर
कृषी आयुक्तांनी शनिवारी (ता.१६) व रविवारी (ता. १७) आढावा बैठकीआधी व नंतर थेट औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे पसंत केले.
औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा बैठकीसाठी औरंगाबादला आलेल्या कृषी आयुक्तांनी शनिवारी (ता.१६) व रविवारी (ता. १७) आढावा बैठकीआधी व नंतर थेट औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे पसंत केले. या वेळी प्रत्यक्ष योजनांची अंमलबजावणीची स्थिती, शेतकऱ्यांच्या प्रक्रिया, पूरक उद्योगाच्या अपेक्षा याबाबत याची माहिती घेण्यासह आयुक्तांनी यंत्रणेला, उत्पादक ते ग्राहक थेट साखळी, ‘विकेल ते पिकेल’सह योजनांच्या अंमलबजावणीच्या सूचना केल्या.
औरंगाबाद कृषी विभागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार शनिवारी (ता. १६) दुपारी औरंगाबादेत आले. त्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांसह त्यांनी थेट जालना जिल्ह्यातील वरुडी, राजेवाडी, हडप सावरगाव आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या. ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत स्टॉल शुभारंभ, मोतीपालन, पोकरा योजनेअंतर्गत सामूहिक शेततळे, फळबाग, शेडनेट, उन्हाळी सोयाबीन लागवड शेतीला भेट, एकात्मिक पाणलोट कामाची पाहणी, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून गटशेतीने केलेली कामे आदींची वस्तुस्थिती जाणून घेतली. वरुडी फाट्यावर विकेल ते पिकेल अंतर्गत शेतीमाल विक्री स्टॉलचा प्रारंभ कृषी आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कृषी आयुक्तांनी जयकिसान शेतकरी गटाचे जयकिसन शिंदे यांच्याशी संवाद साधला.
राजेवाडी येथील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी मोसंबीवर प्रक्रिया उद्योगाची, शीतगृहाची वाणवा त्यामुळे उत्पादन दर्जेदार असूनही मिळत नसलेले दर आदी प्रश्न मांडले. हडप सावरगाव येथील आयडियल शेतकरी उत्पादक कंपनीच्या भेटीप्रसंगी कंपनीचे प्रमुख भगवानराव डोंगरे यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या अडचणी आयुक्तांसमोर मांडल्या. सर्व प्रश्नांना समजून घेत त्यावर सकारात्मक प्रतिसाद आयुक्त धीरजकुमार यांनी दिला.
रविवारीही केली पाहणी
रविवारी औरंगाबाद तालुक्यातील पूरक व प्रक्रिया उद्योगासह उभ्या असलेल्या व्यावसायिक प्रक्रिया उद्योगांची नेमकी गरज काय हे जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी शेंद्रा एमआयडीसीमधील भात व औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या. औरंगाबाद शहरातील संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजाराला भेट देऊन सहभागी शेतकरी व ग्राहकांशी संवाद साधला. टोणगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून फळपीक, संरक्षित शेती, बायोगॅस, स्लरी वापर, शेततळे, दुग्ध व्यवसाय स्थिती जाणून घेतली. त्यानंतर खुलताबाद तालुक्यातील अब्दीमंडी येथील देवगिरी तेलघाणा उद्योग, वेरूळ परिसरातील शेतकरी उत्पादक कंपनीची वाटचाल, गंगापूर तालुक्यातील गावांना भेटी दिली.
- 1 of 670
- ››