Agriculture news in marathi Agriculture in the Corona crisis, Marketing Account Fail: Loss | Agrowon

कोरोनाच्या संकटात कृषी, पणन खाते अपयशी ः खोत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

नाशिक : कोरोनाच्या संकटात राज्याचे कृषी आणि पणन खाते पूर्णतः अपयशी ठरले आहे’’, असा आरोप माजी कृषी राज्यमंत्री आणि 'रयत क्रांती'चे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केला. 

नाशिक : ‘‘कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा शेतमाल पडून राहिला. मागणी व पुरवठा साखळी खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या परिस्थितीत संबंधित खात्यांनी लक्ष दिले असते, तर नुकसान टाळता आले असते. त्यामुळे कोरोनाच्या संकटात राज्याचे कृषी आणि पणन खाते पूर्णतः अपयशी ठरले आहे’’, असा आरोप माजी कृषी राज्यमंत्री आणि 'रयत क्रांती'चे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केला. 

रविवारी (ता.३१) रोजी खोत यांनी पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला. कोरोनाच्या संकटात राज्याचे कृषी पणन खाते अपयशी ठरले. त्यातच आता आता सहकार विभागाची कार्यवाही संथ आहे. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी झाली नाही. आता खरिपाच्या तोंडावर राज्यात पीककर्ज वितरणाची स्थिती गंभीर आहे. बियाणे, खतांचा पुरेसा पुरवठा होत नाही. चढ्या भावाने खते खरेदी करावी लागत असल्याची बाब त्यांनी मांडली. 

खोत म्हणाले... 

  • मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला नाही, आता पत्रव्यवहार करणार 
  • प्रत्येक मंत्र्यांनी बोलण्यापेक्षा आपल्या विभागाने काय केले हे सांगावे 
  • राजू शेट्टी व शरद पवार यांचा अभ्यास सुरू आहे, यावर नंतर पाहू. 
  • राजू शेट्टींचे आंदोलन राष्ट्रीय स्तरावरील 
  • त्यांना छोट्या संघटना त्यांना नको. 
  • कोकणातील आंबा, काजू नुकसानीची भरपाई द्या 
  • राज्य शिखर बँकेने थेट शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा. 
  • शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी ५० टक्के अनुदान द्या 

बँकेविरुद्ध गुन्हे दाखल करा 

कर्ज आणि दीर्घ व मध्यम मुदतीच्या कर्जाचे पुनर्गठन करणे आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे हे सहकार खात्याच्या हातात आहे. पण, ते काही करत नाहीत. खरीप हंगामासाठी पीककर्ज न देणाऱ्या बँकेविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे खोत यांनी सांगितले. 


इतर बातम्या
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारीची...नवापूर, जि.नंदुरबार  ः नवापूर तालुक्यात...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
सारंगखेडा प्रकल्पाग्रस्तांना मोबदल्याची...नंदुरबार  ः जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
रेल्वेस्थानकावर नागपुरी संत्रा विक्रीला...वर्धा ः नागपूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे...