Agriculture news in marathi Of Agriculture Department of Akola ZP Ten crore budget | Page 2 ||| Agrowon

अकोला झेडपीच्या कृषी विभागाचे दहा कोटींचे अंदाजपत्रक 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

अकोला जिल्हा परिषद कृषी विभागाला आगामी आर्थिक वर्षात विविध योजना राबविता याव्यात यासाठी कृषी समितीने १० कोटी २१ लाख रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी (ता. २६) समितीच्या सभेत मंजूर केले आहेत.

अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाला आगामी आर्थिक वर्षात विविध योजना राबविता याव्यात यासाठी कृषी समितीने १० कोटी २१ लाख रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी (ता. २६) समितीच्या सभेत मंजूर केले आहेत.

कृषी विषय समितीची सभा कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती सदस्य अर्चना राऊत, संजय आढाऊ, अनंत अवचार, नीता गवई, दीपमाला दामधर, योगिता रोकडे आदी सदस्य उपस्थित होते. समितीचे सचिव तथा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी सभेचे कामकाज सांभाळले. 

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविते. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ताडपत्री पुरविण्यासह डिझेल पंप व ९० टक्के अनुदानावर इतर लाभ देण्याच्या योजनांचा समावेश आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने शुक्रवारच्या सभेत १० कोटी २१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली. 

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीटी बियाणे वाटप योजनेच्या लाभार्थ्यांकडून परिपूर्ण प्रस्ताव ५ फेब्रुवारीपर्यंत मागविण्यात आले होते. परंतु त्याला शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करून बियाणे खरेदीचे

जीएसटी बिल प्रथम सादर करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन अनुदान देण्याचा ठराव कृषी समिती सभेने मंजूर केला आहे. त्यासाठी लाभार्थी १० मार्चपर्यंत त्रुटीरहित प्रस्ताव कृषी विभागात सादर करण्याचे आवाहनही केले आहे. या शिवाय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ६ योजनांसाठी अर्ज करणाऱ्या व निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे त्रुटी रहित प्रस्ताव ३१ मार्च पूर्वी पंचायत समिती स्तरावर सादर करावेत, असेही समितीने म्हटले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...