agriculture news in Marathi, agriculture department and sugar factories will implement Humani control program, Maharashtra | Agrowon

हुमणी नियंत्रणासाठी ‘कृषी’ला साखर कारखानदारांची साथ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

गावोगावी कारखानदारांना एकत्र घेवून आम्ही आमची यंत्रणा यासाठी वापरत आहोत. जूनच्या मध्यात मोठ्या ताकदीने हुमणी निर्मूलनासाठी प्रयत्न करण्यात येतील
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

कोल्हापूर : उसाचे हुमणीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी यंदापासून कृषी विभाग व साखर कारखान्यांच्या संयुक्त विद्यमाने हुमणी प्रतिबंधक मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. नियोजन करून हुमणी नष्ट करण्यासाठी अशा प्रकारे आखलेली ही राज्यातील पहिलीच मोहीम आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे सहाशे गावात ही मोहीम आखण्यात आली आहे. कृषी विभागासह जिल्हाधिकाऱ्यांनीही यात लक्ष घालून हुमणी नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुुरू केले आहेत. दहा ते वीस जूनच्या दरम्यान कृषी विभाग व कारखान्यांचे कर्मचारी गावोगावी हा उपक्रम राबविणार आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक वर्षी हुमणीने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हजारो हेक्‍टरचा ऊस केवळ हुमणीने खराब होतो. प्रत्येक वर्षी हुमणी नियंत्रणाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नुकसानीत भरच पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कृषी विभाग व कारखानदारांची बैठक बोलावून वस्तुस्थितीची माहिती करून घेतली. 

तज्ज्ञांकडून हुमणीचे कालचक्र समजावून घेतल्यानंतर या मोहिमेला मूर्त स्वरूप आले आहे. कृषी विभागाकडून सर्वाधिक हुमणी असणाऱ्या गावांची यादी तयार करण्यात आली आहे. सुमारे सहाशे गावांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मोठा असतो. या गावांमध्ये प्रामुख्याने हुमणी नियंत्रणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. प्रत्येक गावात फलक लावून जागृतीही करण्यात येणार आहे. तांत्रिक सहकार्य कृषी विद्यापीठाकडूनही घेण्यात येईल. 

अशी राबणार यंत्रणा 
कृषी विभागाचे कृषी सहायक, आत्माचे कृषी मित्र व कारखानदारांचे प्रतिनिधी संयुक्तपणे हुमणी नियंत्रण मोहिमेत भाग घेतील. दहा ते वीस जूनच्या दरम्यान हुमणीचे भुंगे बाहेर पडण्याचा कालावधी असतो. या कालावधीत हे भुंगे शेतातील मोठ्या झाडावर असतात. हे किडे सायंकाळच्या वेळेत गोळा करुन ते नष्ट क्‍रण्यात येणार आहेत. प्रतिबंधासाठी लागणारी औषधे आत्मा विभागाकडून देण्यात येतील. फवारणीचे साहित्य कारखानदारांकडून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच हुमणी नियंत्रणासाठी कल्चर शासकीय प्रयोगशाळा तसेच खासगी ठिकाणाहून देण्यात येईल. शेतकऱ्यांनी औषधाची खरेदी केल्यानंतर ही रक्कम त्यांना डीबीटी स्वरूपात उपलब्ध करण्यात येईल. खर्चाचा भार कृषी विभाग व कारखाने संयुक्तपणे उचलणार आहेत.

प्रतिक्रिया
जिल्ह्याला हुमणीचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. कृषी विभाग व कारखानदार एकत्र येऊन ही मोहीम राबवणार आहेत. व्यापकपणे उपाययोजना झाल्यास जिल्ह्यातून हुमणीचे संकट दूर होईल.
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर 

 

इतर अॅग्रो विशेष
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...