अकोला विद्यापीठातील प्रदर्शनात कृषी विभागाचेच दालन सर्वोत्कृष्ट

अकोला विद्यापीठातील प्रदर्शनात कृषी विभागाचेच दालन सर्वोत्कृष्ट
अकोला विद्यापीठातील प्रदर्शनात कृषी विभागाचेच दालन सर्वोत्कृष्ट

अकोला  ः  डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठात २७ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित अॅग्रोटेक २०१९ कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. कृषिक्रांतीचे प्रणेते कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय सत्र झाले. या वेळी व्यासपीठावर माजीमंत्री वसुधाताई देशमुख यांच्यासह विद्यापीठाचे  कृषी अधिष्ठाता डॉ. पी. जी. इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे,  शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर,  कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, कुलसचिव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, प्रगतिशील शेतकरी अप्पा गुंजकर आदी उपस्थित होते.  तीन दिवसीय कृषी प्रदर्शनामध्ये विविध संस्थांच्या दालनांमधून शेतकऱ्यांसाठी प्रदर्शित केलेल्या कृषी तंत्रांद्वारे शेतकऱ्याला नवीन दिशा देण्याचे काम विद्यापीठाने केले असल्याचा उल्लेख करीत विद्यापीठ प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन व सांघिक प्रयत्न कारणीभूत ठरल्याचे वसुधाताई देशमुख यांनी सांगितले. डॉ. भाले यांनी राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या आयोजनासाठी संधी दिल्या बद्दल राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांचे आभार व्यक्त केले. जिल्हा प्रशासनाने सुद्धा कृषी विभाग तथा प्रकल्प संचालक आत्माअंतर्गत सहयोग दिल्यामुळेच सदर प्रदर्शन शक्य झाल्याचे सांगितले. प्रास्ताविक संचालक विस्तार शिक्षण डॉ. मानकर यानी तर सूत्रसंचालन आणि आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी मानले. खारपाण पट्ट्याचे मॉडेल ठरले आकर्षण  कृषी अधीक्षक अधिकारी मोहन वाघ यांच्या नेतृत्वात खारपाण पट्ट्याचे मॉडेल दर्शनी भागात साकारले होते. या दालनाला हजारो शेतकऱ्यांनी भेट देत पाहणी केली. खारपाण पट्ट्याच्या या दालनात पोकरा योजनेत सहभागी गावांची नावेही प्रदर्शित करण्यात आली होती. सहभागींचा गौरव  सहभागींना पारितोषिके आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये शासकीय गटात कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), पाटबंधारे संशोधन विभाग यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. निमशासकीय गटामध्ये सेंद्रिय शेती, अखिल भारतीय समन्वयित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांनाही अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय विविध दालनांचा गौरव करण्यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com