‘स्मार्ट’ला अर्ज करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत अर्ज सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
‘स्मार्ट’ला अर्ज करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
‘स्मार्ट’ला अर्ज करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत अर्ज सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून अर्ज मागविण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती. त्यास मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या समुदाय आधारित संस्थांकडून करण्यात आली होती. त्यानुसार मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत १,७५० अर्ज प्राप्त झालेले आहेत. या प्रकल्पातून सर्वसमावेशक व स्पर्धाक्षम मूल्यसाखळ्या विकसित करावयाचे उद्दिष्ट आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या समुदाय आधारित संस्थांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचे  आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com