'कृषी'च्या बंद खात्यात आठ कोटी

'कृषी'च्या बंद खात्यात आठ कोटी

नागपूर : औरंगाबाद ‘आत्मा’ कार्यालयातील लिपिकाच्या अपहार प्रकरणानंतर राज्यात विनापरवानगी काढण्यात आलेली खाती बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अंतर्गत नागपूर कृषी विभागात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २०५ विनापरवानगी खाती असल्याची माहिती समोर आली आहे. ही खाती बंद करून त्यातील ८ कोटी रुपयांचा निधी शासन जमा करण्यात आला आहे.  औरंगाबाद ‘आत्मा’ कार्यालयात लिपिकाने ६६ लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आत्मा प्रकल्प संचालकांना न कळविता लिपिकाने परस्पर रक्‍कम काढल्याचे चौकशीत पुढे आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिस तक्रारही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणापासून बोध घेत कृषी विभागाने राज्यात वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता काढण्यात आलेली बॅंक खाती बंद करण्याचे आदेश दिले. 

याकरिता पुणे कृषी आयुक्‍तालयातील विस्तार व प्रशिक्षण संचालक डॉ. एस. एल. जाधव यांना राज्यभर बैठका घेण्याकरिता पाठविण्यात आले. त्यांनी या बैठकांमधून वापरात नसलेल्या आणि विनापरवानगी काढलेल्या बॅंक खात्यांचा आढावा घेतला. अशा प्रकारची खाती तात्काळ बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागपूर व अमरावती विभागांचा आढावा त्यांनी गेल्या आठवड्यात घेतला होता. दरम्यान बॅंक खाती बंद करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत गडचिरोली जिल्हा कृषी विभाग पिछाडीवर असल्याची माहिती आहे. बॅंक खात्यासंदर्भाने त्यांच्याकडील माहिती परिपूर्ण नसल्याचे सूत्रांनी सांगितले.     रक्कम वरिष्ठ कार्यालयाच्या खात्यात वळती नवीन योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेअंतर्गत लाभार्थींचा वाटा भरण्याकरिता स्वतंत्र खाते काढले जाते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत अशा प्रकारची सुमारे २०५ खाती आढळून आली. या खात्यांमध्ये असलेले सुमारे आठ कोटी रुपये वरिष्ठ कार्यालयाच्या खात्यात वळते करण्यात आल्याची माहिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com