Agriculture news in Marathi agriculture department report must be accepted for crop insurance also | Agrowon

‘कृषी विभागाने केलेले पंचनामेच पीकविम्यासाठी ग्राह्य धरावे’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नगर ः आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. मात्र त्या वेळी पंचनामे करण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करण्यासाठी गेलेले नाहीत. त्यामुळे कृषी विभागाने केलेले पंचनामेच गाह्य धरून खरिपाचा विमा लागू करावा, अशी मागणी वांबोरी (ता. राहुरी) येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांच्यासह शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना निवेदन देऊन केली आहे. 

नगर ः आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. मात्र त्या वेळी पंचनामे करण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करण्यासाठी गेलेले नाहीत. त्यामुळे कृषी विभागाने केलेले पंचनामेच गाह्य धरून खरिपाचा विमा लागू करावा, अशी मागणी वांबोरी (ता. राहुरी) येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांच्यासह शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना निवेदन देऊन केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, खरिपात नगर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून विमा उतरवला आहे. मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या जास्तीच्या पावसाने बाजरी, कापूस, तूर, सोयाबीन, मका, कांदा आदींसह खरिपातील अनेक पिकांचे नुकसान झाले.  त्यानंतर झालेल्या नुकसानीचे कृषी, महसूल विभागाने पंचनामे केले. त्यानुसार ३३ टक्‍क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली. ज्या वेळी महसूल, कृषी विभागाचे लोक नुकसानीचे पंचनामे करत होते, त्या वेळी विमा कंपनीचे प्रतिनिधीही नुकसान पाहायला व पंचनामे करायला हजर राहणे गरजेचे होते. मात्र एकही विमा कंपनीचा प्रतिनिधी प्रत्यक्ष नुकसान पाहायला व पंचनामे करायला नव्हता. 

आता झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी पीकविम्याचा लाभ देताना पीककापणी व अन्य बाबी पाहण्यापेक्षा शासनाने ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे. त्या शेतकऱ्यांचे पंचनामे गृहीत धरून अतिवृष्टीने नुकसान  झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना विमा योजना लागू करून विम्याचे पैसे थेट खात्यावर जमा करावेत. नुकसान झालेले असतानाही अनेक कारणे पुढे करून पीकविमा योजनेच्या रकमेपासून वंचित ठेवले, तर शेतकरी टोकाचे पाऊल उचलतील व त्याला विमा कंपन्या जबाबदार राहतील, असे विष्णू ढवळे व शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री, मुख्यमंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्त यांनाही निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.


इतर बातम्या
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...
नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
नगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...
नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...
आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
सिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...
साखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...