agriculture news in Marathi, Agriculture Department says American fall army worm in control, Maharashtra | Agrowon

लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभाग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील अमेरिकन फॉल आर्मी वर्म कीड होती. मात्र, ९९ टक्के क्षेत्रात उपचार करण्यात आले असून, ३२२ गावांमधील प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे, असे कृषी विभागाच्या एका अहवालात म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ३६१ गावांमध्ये किडीने ईटीएल (आर्थिक नुकसान पातळी) ओलांडली होती. मात्र, चार सप्टेंबरअखेर ३२२ गावांमधील प्रादुर्भाव आटोक्यात आला. फक्त १३८ गावांमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात ईटीएलच्या वर कीड होती, असे अहवालात म्हटले आहे.

पुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील अमेरिकन फॉल आर्मी वर्म कीड होती. मात्र, ९९ टक्के क्षेत्रात उपचार करण्यात आले असून, ३२२ गावांमधील प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे, असे कृषी विभागाच्या एका अहवालात म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ३६१ गावांमध्ये किडीने ईटीएल (आर्थिक नुकसान पातळी) ओलांडली होती. मात्र, चार सप्टेंबरअखेर ३२२ गावांमधील प्रादुर्भाव आटोक्यात आला. फक्त १३८ गावांमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात ईटीएलच्या वर कीड होती, असे अहवालात म्हटले आहे.

..तरी उत्पादन घटत नाही
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत ३६१ गावांत कीड आढळली. विशेष म्हणजे, २३३ गावांमध्ये नव्याने ही कीड आढळली आहे. मुळात कीड आढळली म्हणजे नुकसान झाले, असा अर्थ काढता येणार नाही. कारण, २५ टक्के प्रादुर्भाव असला, तरी उत्पादन विशेष घटत नाही, असे जागतिक अन्न संघटनाच सांगते आहे, असाही दावा कृषी विभाग करीत आहे.

८५८ शेती शाळा घेतल्या
''अमेरिकन फॉल आर्मी वर्म'' वर्मबाबत उपाययोजना केल्या नाहीत, हा मुद्दा कृषी विभागाच्या अहवालात फेटाळून लावला गेला आहे. "साडेपाच हजार गावांत या किडीचे सर्वेक्षण झाले. त्यात पुन्हा ८५८ गावांत शेतीशाळा घेऊन एक लाख ४९ हजार कामगंध सापळे आणि चार लाख ४९ लाख लुर्स वाटले गेले आहेत. २६ हजार ६३४ लिटर कीटकनाशके वाटण्यात आली. जनजागृतीची आम्ही एकही बाब सोडलेली नाही. विशेष म्हणजे बियाणे व कीडनाशके उत्पादक कंपन्यांना देखील जिल्हे वाटून दिले. यामुळे जनजागृती मोहीम यशस्वी झाली," असा दावा कृषी विभागाने केला आहे.

कीड नियंत्रण मोहीम यशस्वी
"जिल्हा नियोजन निधीचा वापर, उद्योगातील सीएसआर निधी, कृषी विद्यापीठांच्या मदतीने १७९ सल्ले, पाच हजार गावबैठका, २८ हजार घडीपत्रिका वाटप आणि सहा लाख एसएमएसचा प्रसार, अशी एकत्रित भव्य मोहीम राबविण्यात आल्याने कीड नियंत्रण चांगले झाले आहे," असेही कृषी विभागाचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...