agriculture news in Marathi, Agriculture department says, cotton has no threat of American fall army worm, Maharashtra | Agrowon

लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी विभाग
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मी वर्म) धोका नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. “राज्यात यंदा ४३ लाख ८१ हजार हेक्टरच्या आसपास कपाशीची लागवड झालेली आहे. 

गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सध्या तरी कपाशीवर नगण्य कीड आहे. ही कीड देखील लष्करी अळी वर्गातील नाही. कपाशीला लष्करी अळीपासून धोका नाही. ही कीड केवळ मका आणि मका वर्गीय पिकांना लक्ष करते,” असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मी वर्म) धोका नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. “राज्यात यंदा ४३ लाख ८१ हजार हेक्टरच्या आसपास कपाशीची लागवड झालेली आहे. 

गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सध्या तरी कपाशीवर नगण्य कीड आहे. ही कीड देखील लष्करी अळी वर्गातील नाही. कपाशीला लष्करी अळीपासून धोका नाही. ही कीड केवळ मका आणि मका वर्गीय पिकांना लक्ष करते,” असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

कपाशीच्या ३९ हजार हेक्टरवर विविध प्रकारची कीड सध्या आढळून आलेली आहे. मात्र, किडीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रावर उपचारदेखील करण्यात आलेले आहेत. सध्या ६१ गावांमध्ये गुलाबी बोंड अळी तर १०० गावांमध्ये तुडतुडे मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. मात्र, लष्करी अळीचा कपाशी पिकावर मोठा उद्रेक असल्याचे आढळलेले नाही. 

“लष्करी अळी कोणत्याही पिकावर दिसू शकते. १८० पिके या किडीची खाद्य आहेत. मात्र, तिचे मुख्य खाद्य मका आहे. मका नसल्यास बाजरी, ज्वारीत लष्करी अळी जाते. काही भागात कोणतेच खाद्य नसल्यास क्वचित कपाशीवर लष्करी अळी दिसू शकते. मात्र, त्यावर मोठा प्रादुर्भाव होणे किंवा शेकडो एकर कपाशीवर ही कीड पसरणे, या बाबी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये,’’ असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
 
गुलाबी बोंड अळी हीच कपाशीसाठी यंदा धोकादायक वाटत होती. मात्र, नैसर्गिक स्थितीमुळे गुलाबी बोंड अळीचे देखील चांगले नियंत्रण झाले आहे. राज्यात २० ते २५ हजार कपाशी उत्पादक गावे आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ५०-६० गावांमध्ये ईटीएल लेव्हलच्यावर (आर्थिक नुकसान पातळी) गुलाबी बोंड अळी आढळली आहे. 

कपाशीवर यंदा कीड रोखण्यासाठी अडीच हजारांपेक्षा जास्त शेतीशाळा घेण्यात आल्या. सव्वा दोन लाख कामगंध सापळे, साडे सहा लाख ल्युअर्स वाटप आणि साडेसोळा हजार लिटर्स कीटकनाशके वाटल्यामुळे कीडनियंत्रण चांगले झाले आहे, असाही दावा कृषी विभागाने केला आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...