कृषी विभागाने खरिपाचे काटेकोर नियोजन करावे ः जयंत पाटील

सांगली ः खरीप हंगामासाठी आवश्यक असणारी खते, बियाणे, कीटकनाशके शेतकर्‍यांना मागणी प्रमाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्या. तसेच शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही यासाठी खबरदारी घ्या. कृषी विभागाने हंगामाचे काटेकोर नियोजन करावे, असा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
Agriculture department should plan kharif carefully: Jayant Patil
Agriculture department should plan kharif carefully: Jayant Patil

सांगली ः खरीप हंगामासाठी आवश्यक असणारी खते, बियाणे, कीटकनाशके शेतकर्‍यांना मागणी प्रमाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्या. तसेच शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही यासाठी खबरदारी घ्या. कृषी विभागाने हंगामाचे काटेकोर नियोजन करावे, असा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. 

पालकमंत्री पाटील यांनी खरीप हंगामाची बुधवारी (ता. २९) ऑनलाइन आढावा बैठक घेतली. या बैठकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. 

मागील वर्षामध्ये अतिवृष्टी, महापूर व अवकाळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांकडील सोयाबीन बाधित झाल्याने बियाणे म्हणून वापरण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे महाबीजकडे ७ हजार ५८४ क्विंटलची वाढीव मागणी करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांना स्वत:कडील सोयाबीन बियाणे वापरावयाचे आहे, त्यांच्यासाठी गावस्तरावर उगवण क्षमता प्रात्यक्षिके घेण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी उगवण चाचणी घेतल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. 

कृषी विभाग आणि जिल्हा परिषद कृषी विभाग असे एकूण ३२ गुणनियंत्रक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२०-२१ साठी गुणनियंत्रण नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ११ भरारी पथके स्थापन केली आहेत. यांच्यामार्फत सर्व विक्री केंद्रांची तपासणी केली जाणार आहे. 

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे दावे दोन-तीन वर्षे प्रलंबित राहिल्याचे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे एखाद्या शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास ग्रामसेवक व कृषी पर्यवेक्षकांनी कागदपत्रांची पूर्तता करून विमा कंपन्यांकडून मुदतीत संबंधित कुटुंबाला मदत मिळवून द्यावी. यामध्ये कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, अशा कडक सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. 

जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन  जिल्ह्यात खरीपासाठी ३ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, खरीप ज्वारी, मका, इतर तृणधान्ये असे १ लाख ६१ हजार ३०० आणि तूर, मूग, उडीद व अन्य कडधान्याचे ४१ हजार ५०० असे अन्नधान्याच्या पिकाखाली २ लाख २ हजार ८०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. भुईमूग, कारळा, सूर्यफूल, सोयाबीन व अन्य तेलबिया अशा ९३ हजार १०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी ५२ हजार ८५३ क्विंटल बियाणांची मागणी आहे. त्याचे नियोजन केले आहे. 

कोरोनाचा बाऊ न करता विद्युत यंत्रणा सुरळीत ठेवा  जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुरूस्ती अभावी ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने लोकांची गैरसोय होत आहे, अशी तक्रार अनेक लोकप्रतिनिधींनी केली. पालकमंत्री पाटील म्हणाले की, वीज वितरण कंपनीने कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा बाऊ न करता नादुरूस्त ट्रान्सफॉर्मरची तत्काळ दुरूस्त करा. जिल्ह्यात विद्युत यंत्रणा सुरळीत ठेवा. कृषी पंपांच्या प्रलंबित जोडण्या तत्काळ द्याव्यात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com